मा. जिल्हाधिकारी यांचा परीचय


मुख्यपृष्ठ मा. जिल्हाधिकारी यांचा परीचयश्री. अरुण किशोर डोंगरे हे ७ जानेवारी १९९१ रोजी शासनसेवेत परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी म्हणुन प्रथम रुजू झाले. ७ जानेवारी १९९३ ते १ जुलै २००३ या दरम्यान विदर्भातील विविध ठिकाणी त्यांनी प्रांत अधिकारी (उपजिल्हाधिकारी) म्हणुन काम पाहिले.
२ जुलै २००३ ते ७ ऑगस्ट २००७ या दरम्यान अमरावती जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी, त्यानंतर ११ आक्टोबर २०१० पर्यंत अमरावती विभागीय आयुक्तालयात उपायुक्त (महसुल ), ७ जुलै २०१२ पर्यंत उपायुक्त (सामान्य) त्यानंतर पुन्हा ४ नोव्हेंबर २०१२ पर्यंत उपायुक्त ( महसुल) म्हणून काम पाहिल्यानंतर ५ नोव्हेंबर २०१२ ते १० एप्रील २०१५ या कालावधीत त्यांनी अमरावती महापालीकेचे आयुक्त म्हणुन काम पाहिेले आहे.
२००३ साली शासनाचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या कालावधीत अमरावती महापालीकेची केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील आटो डीसीआर प्रणालीसाठी तसेच ई-इंडीया पुरस्कार मिळाला. World Bank Asia Wing मार्फत बँकॉक, थायलंड येथे दिनांक १५.०६.२०१२ ते ०६.०७.२०१२ या कालावधीत "Leaders Development Programme for Public Utility Managers in Asia" प्रशिक्षण तसेच दिनांक २० जून,२०१६ ते दिनांक २९ जुलै, २०१६ या कालावधीत प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, पश्चिम बंगाल येथे प्रतिष्ठापना (Induction Training) प्रशिक्षण प्राप्त केलेले आहे.
भारतीय प्रशासकिय सेवा (भाप्रसे) संवर्गात समाविष्ट झाल्यानंतर १५ मे २०१५ पासून ते २७ एप्रील २०१७ पर्यंत सोलापुर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिेले आहे. त्यांच्या कार्यकालात सोलापूर जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणारा सन २०१६-१७ चा यशवंत पंचायत राज पुरस्कार (महाराष्ट्र राज्य स्तरीय, सर्वद्वितिय) प्राप्त झाला. राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या जलयुक्‍त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यास सन २०१५-१६ यावर्षीचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
प्रशासकिय सेवेत राहुन सामाजिक कार्याची बांधिलकी मनात ठेवून त्यानी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवुन विविध सामाजिक ज्वलंत प्रश्नावर प्रबोधन व मार्गदर्शन केले आहे. श्री. अरुण किशोर डोंगरे यांनी दिनांक २८ एप्रील २०१७ रोजी जिल्हाधिकारी, नांदेड या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

 
Top