वनक्षेत्र

जिल्‍हयातील वनक्षेत्र हे उपवनरक्षक यांच्‍या नियंत्रणाखाली आहे. वनक्षेत्राच्‍या संरंक्षणासाठी आणि संवर्धणासाठी नांदेड येथे वन अधिका-याचे विभागीय कार्यालय कार्यरत आहे.
जिल्‍हयात सन १९७१ मध्‍ये १,२३३.७७ चौ.कि.मी. वनक्षेत्र होते. ते सध्‍या १,२९९.१० चौ.कि.मी. असुन त्‍यापैकी वनविकास महामंडळ किनवट यांना १७३.६३ चौ.कि.मी.वनक्षेत्र हंस्‍तातरीत करण्‍यात आल्‍याने नांदेड वनविभागाकडे सदयस्थितीत ११२५.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र शिल्‍लक आहे. त्‍यापैकी राखीव वनक्षेत्र १०८६.५४ चौ.कि.मी. आहे. संरक्षीत वनक्षेत्र १५.१० चौ.कि.मी.आहे. अवर्गीकृत वनक्षेत्र ४७.३८ चौ.कि.मी. आहे. तर पर्यायी वनीकरण क्षेत्र १९.३३ चौ.कि.मी. आहे. जिल्‍हयात नांदेड वन विभागाच्‍या आणि वनविकास महामंडळाच्‍या अधिपत्‍याखालील क्षेत्र वगळता इतर महसुल विभागाकडे अधिघोषीत वनक्षेत्र नाही. महसुल विभागाकडे असलेले गायरान वनोत्‍तर क्षेत्र ही मागील१९९२ ते २००८ पर्यत २२८४ हे. वनक्षेत्र वनविभागाने ताब्‍यात घेऊन ते सरंक्षीत वन जाहीर केले आहे. जिल्‍हयात एकुण भौगोलिक क्षेत्राशी टक्‍केवारी १२.२२ इतकी आहे.


जिल्ह्यातील परीक्षेत्रनिहाय व वर्गीकरणनिहाय वनक्षेत्र

अ.क्र वन परिक्षेत्र राखीव क्षेत्र प्रस्‍तावीत राखीव वन संरक्षित वन अवर्गिकृत वन पर्यायी वनीकरण एकूण वनविकास महामंडळास हस्‍तांतरीत क्षेत्र वन विभागाकडे शिल्‍लक क्षेत्र
1 माहूर 9,985.13 0 299.2 3,094.97 95 13,474.30 0 13,474.30
2 किनवट 14,177.30 3,215.92 200.26 0 95 17,688.48 6,066.04 11,622.40
3 मांडवी 10,732.93 1,456.48 100 0 69 12,358.41 1,194.98 11,163.40
4 बोधडी 8,420.13 2,312.92 20 0 140 10,893.05 1,683.47 9,209.50
5 इस्‍लापूर 10,116.17 0 0 0 0 10,116.17 1,409.28 8,706.80
6 अप्‍पाराव पेठ 11,595.46 0 0 0 0 11,595.46 7,009.67 4,585.00
7 भोकर 11,813.05 1,827.70 85 173.39 147 14,046.14 0 14,046
8 हदगाव 10,609.59 505.86 195 0 485.08 11,795.53 0 11,795
9 हिमायतनगर 4,613.93 0 0 401.1 145 5,160.03 0 5,160.03
10 नांदेड 7,181.31 1,717.48 252 262.23 250 9,663.03 0 9,663.03
11 मुखेड 6,770.63 1,000.44 84.26 0 242 8,097.33 0 8,097.33
12 देगलूर 2,638.65 1,037.39 275 806.37 265.19 5,022.60 0 5,022.60
एकूण 1,08,654.28 13,074.19 1,510.72 4,738.06 1,933.27 1,29,910.53 17,363.44 1,12,547.09

तालुकानिहाय वनक्षेत्र

अ.क्र तालुका एकूण वनक्षेत्र वनविकास महामंडळास हस्‍तांतरीत क्षेत्र (हेक्‍टर) वन विभागाकडे शिल्‍लक क्षेत्र (हेक्‍टर)
1 माहूर 13,474.30 0 13,474.30
2 किनवट 62,651.56 17,363.44 45,288.12
3 हदगाव 11,795.53 0 11,795.53
4 हिमायतनगर 5,160.03 0 5,160.03
5 भोकर 14,501.13 0 14,501.13
6 धर्माबाद 148.852 0 148.852
7 उमरी 3,046.47 0 3,046.47
8 अर्धापूर 1,805.31 0 1,805.31
9 कंधार 2,344.18 0 2,344.18
10 लोहा 3,114.93 0 3,114.93
11 मुदखेड 1,627.00 0 1,627.00
12 मुखेड 5,218.63 0 5,218.63
13 बिलोली 2,980.92 0 2,980.92
14 देगलूर 935.236 0 935.236
15 नायगाव 1,106.45 0 1,106.45
16 नांदेड 0,000 0 0,000
एकूण 1,29,910.53 17,363.44 1,12,547.09

नांदेड वन विभाग व वनविकास महामंडळा अंतगर्तच्‍या वनक्षेत्रात पुर्ण नांदेड जिल्‍हयाच्‍या भौगोलिक भागाचा समावेश आहे. नांदेड जिल्‍हयाच्‍या दक्षिण भागात अत्‍यंत विरळ झाडोरा व पडीत वनक्षेत्राची व्‍याप्‍ती जास्‍त आहे. नांदेड वन विभागात एकुण १,१२५४७.०९० हे. वनक्षेत्र असुन त्‍याचा प्रशासकीय व्‍यवस्‍थापणासाठी ते एकुण १२ वनपरीक्षेत्रात विभागण्‍यात आलेले आहे. त्‍यात माहुर, किनवट, मांडवी, बोधडी, इस्‍लापुर, अप्‍पाराव पेठ, भोकर,हदगाव, हिमायतनगर, नांदेड, मुखेड, देगलुर ही वनपरीक्षेत्रे आहेत.
जिल्‍हयात किनवट तालुक्‍यात सर्वोधिक वनक्षेत्र असुन त्‍या खालोखाल भोकर तालुक्‍याचा क्रमांक लागतो. पुढील विवरणपत्रात जिल्‍हयातील वनक्षेत्राची परिक्षेत्र निहाय व वर्गीकरण निहाय माहिती दिलेली आहे.
वनविकास महामंडळाच्‍या नांदेड जिल्‍हयातील वन विभागाची सन १९७५ ला स्‍थापणा करण्‍यात आली. नांदेड जिल्‍हा दक्षिण पठाराच्‍या भागात असल्‍यामुळे महाराष्‍ट्राच्‍या सपाट भुभागाच्‍या जिल्‍हयापैकी एक जिल्‍हा आहे. येथील जंगले शुष्‍क व मिश्र पानझडीच्‍या जातीची आहेत. किनवट, नांदेड आणि भोकर येथील जंगले शुष्‍क सागाच्‍या जातीची आहेत. मिश्र – संकीर्ण जातीची जंगलेही साधारणपणे शुष्‍क जंगल प्रकारच्‍या जंगलासारखीच असून फरक फक्‍त इतकाच की,या प्रदेशात सागाचे प्रमाण कमी आहे. जिल्‍हयात टेकडयांच्‍या उतारावरील धूप झालेल्‍या प्रदेशात काटेरी झुडुपाची जंगले आहेत. तर देगलुर येथील जंगलाच्‍या प्रदेशातील ब-याच भागात उथळ जमीनीमुळे  आणि गुरांच्‍या प्रमाणाबाहेर चरण्‍यामुळे गवताळ प्रदेश तयार झाला आहे.
जिल्‍यात प्रमुख जंगलात धावडा, हिंगण, आपटा, कांटेसावर, सालई, कटक, चारोळी, पळस, पाचुंदा, कुंभा, बहावा, भोकर, शीसम, तेंदु, मेदशिंगी, वईनिवडूंग, कवठ, आवळा, मोह, करंज, बिवला, रिठा, जांभुळ, सागवान, अर्जुण, बेहडा, बोर इत्‍यादी मोठे वृक्ष आढळतात. लहाण वृक्ष आणि झुडपे वनस्‍पतीमध्‍ये खैर, हिवर, बाभुळ, सिताफळ, रुई, वाघाठी, करवंद, गेळफळ, रानकेळी, मुरडशेंग, मोगलीएरंड, निवडुंग, निर्मुली, इत्‍यादी प्रमुख लहाण वृक्ष आढळतात. जिल्‍हयातील किनवट तालुक्‍याचा उतर पुर्वभाग डोगंराळ व शेतीसाठी अयोग्‍य असल्‍यामुळे या तालुक्‍याचा भौगोलिक क्षेत्रात ३२.८० एवढे उच्‍च प्रतीचे वनक्षेत्र आहे. किनवट तालुक्‍यात साग मिश्र वर्णीय पानझड प्रकारचे वन असुन अतिशय मौल्‍यवान वनराई व वनचरानी व्‍यापलेला तालुका आहे. तसेच हदगाव व भोकर तालुक्‍यात थोडयाफार प्रमाणात दाट वनक्षेत्राची नैसर्गिक देणगी लाभलेली आहे.


वनसंपदा

संपुर्ण मराठवाडा विभागामध्‍ये आठ जिल्‍हयापैकी नांदेड हा अंत्‍यत समृध्‍द अशा वनसंपदेचा जिल्‍हा आहे. इतर ७ जिल्‍हयात मिळुन जेवढी नैसर्गिक संपत्‍तीची विविधता आहे. तेवढी विविधता एकटया नांदेड जिल्‍हयात आढळुन येते. वनसंपदेच्‍या दुष्‍टीकोणातुन ही गोष्‍ट तंतोतंत खरी आहे.
वनसंपदा आणि वनश्रीचा दुष्‍टीने नांदेड जिल्‍हयाचे तीन स्‍वाभावीक विभाग पडतात. ते असे.१)उत्‍तरेकडील किनवट – माहुरच्‍या जंगलाच्‍या रांगा. २)उत्‍तर पुर्वस (ईशान्‍य) कडील भोकर – हदगांव जंगलाच्‍या रांगा ३)दक्षिणेकडील गोदावरीचे खोरे नांदेड जिल्‍हयात प्रामुख्‍याने सांगवनाची जंगले दिसुन येतात. यात इतर अनेक विविध वृक्षाचा समावेश होतो. मुख्‍यत्‍वे Anogeissus latifolia (धावडा) Balanites aegyptiaca (हिंगण) Barringtonia acutangula, Bauhinia recemosa (आपटा) Bombax criba (कांटे सावर),  Boswellia serrata (सालई) Bridelia airy- shawii (कटक) Buchanania lanzan (चारोळी) Buyra monodprtma (पळस) B.Superba(पळसवेल), Capparis grandis(पाचुंदा), Careya arborea (कुंभा),Casearia elliptica (यस्‍सी), Cassia fistula(बहावा), Chloroxylon Swietenia, Cleistanthus collinus,Cochlospermum religiosum(गणेर), Cordia dichotoma, (भोकर), Dalbergia lanceolaria,D.latifolia,(शिशम), Diospyros Melanoxylon,(तेंदु), Dolichandrone falcate,(मेदशिंगी), Erythrina suberosa,(पांगारा), Euphorbia nivulia,(वई निवडुंग),Flacourtia indica, Garuga pinnata,(काकड), Gimelina arborea,(शिवण), Grewia tiliifolia,(धामण), Haldina cordifolia,(हळद),Holoptelea integrifolia,(चिरबिल्‍व),Kydia calycina, Lagerstroemia parviflora,(लेंडी),Lannea coromandelia,(मोई),Limonia acisissima,(कवठ),Madhuca indica,(मोह),Mallotus philippensis,(कपिला), Mitragyna parvifolia, (कलम), Ougeninia oojenensos,(तिवस),Phoeniz sylvestris, (शिंदी),Phyllanthus emblica, (आवळा), Pongamia pinnata(करंज),pterocarpus,(बिवला),marsupium Sapindus emarginatus (रिठा), S.laurifolius (रिठा),Schleichera oleosa,(कुसुंभ),Soymida febrifuga, (रोहण), Stereosprmum chelenoides,(पाडळ),S.Colais,(पाडळ),Syzygiun cumini,(जांभुळ), Tectona grandis,(सागवान), Terminalia alata, T.arjun,(अर्जुण) T.bellirica,(बेहाडा),T.cremulata, Toona serrata(तुण),  Wrightia tinctoria(काळाकुडा)  आणि ZiZiphus(बोर) वगैरे वृक्ष आढळुन येतात.


उत्तपरेकडील किनवट-माहूर जंगलांच्या रांगा

या रांगा सर्वात जास्‍त समृध्‍दीने नटलेल्‍या असून या भागात वृक्षाची चांगली वाढ होते. येथील सागवानाचे वृक्ष उंच आणि सरळ वाढत असल्‍याने त्‍यांच्‍यापासुन उत्‍तम इमारतीचे तसेच घरगुती सामानाचे लाकुड उपलब्‍ध होते. सागवानाबरोबर इतर अनेक वृक्ष येथे आढळता.प्रामुख्‍याने Anogeiscus latifolia (धावडा),Barringtonia acutangula, Bridelia airy shawii (कटक) Buchanania lanzan (चारोळी) Butea Monosperma (पळस) B.superba (पळसवेल), Careya arborea(कुंभा), Chloroxylon swietenia, Cleistanthus collinus Cochlosperrmum religiousm(गणेर), Dalbergia lanceolaria, Euphorbia nivulia (वई निवडुंग) Haldina cordifolia (हळद) Holoptelea interbia(चिरबिल्‍व) Madhuca indica (मोह), Mallotus Philippensis  (कपीला) Ougeinia oogeinensis(तिवस), pterocarpus Marsupium(निवळा) Schleichera oleosa(कुसुंभ) Stereospermum chelenoides(पाडळ) आणि Terminalia spp. या वृक्षाचा समावेश होतो.         तसेच अनेक प्रकारची झुडुपे ,लहान वृक्ष यांची देखील येथे रेलचेल आहे. मराठवाडयात इतरत्र कोठेही उपलब्‍ध नसलेल्‍या Orchidaceae कुलातील वनस्‍पती येथे आढळतात. Vanda tessellate ही अशीच एक वनस्‍पती वृक्षांच्‍या आधाराने वाढते. Tacca leontopetaloides या वनस्‍पतीची रोपटी केवळ याच जंगलात आढळतात. Lxora pavelta Leea Macrophylla, Strychnos potatorum (निर्मळी) यासारखी इतरत्र दुर्मिळ असणारी झुडुपे येथे विपुल प्रमाणात आढळतात. जमिनीलगत वाढणा-या वनसंपदेपैकी Cajanus platycarpus, Operculina tupethum,Trichosanthes Tricupidata  वगैरे वनस्‍पती येथे खास करुन आढळतात. शिवाय गवत प्रकारांपैकी Chrysopogon serrulatus Cois gigantean , Eriochloa fatinensis ,Leptochloa Chinensis, Oryza rufipogon, Pseudorraphis spinescens, Vetiveria zizanioides इत्‍यादी प्रजाती येथे उपलब्‍ध आहेत.


उत्तपर –पूर्वकडील भेाकर-हदगांव जंगलांच्यात रांगा

या रांगा उत्‍तरेकडील रांगांच्‍या तुलनेत शुष्‍क आणि निकृष्‍ट दर्जाच्‍या आहेत. येथे देखील सागवानाची जंगले आहेत परंतु लाकडाचा दर्जा दुय्यम प्रतीचा आहे. सागवानाबरोबर Bauchinia racemosa (आपटा) Bombax ceiba(कांटे सावर) Boswellia serrata(सालई), Cassia Fistula (बहावा), Cordia dichotoma (भोकर), Diospyos Melanoxylon (टेंभुर्णी) Erythrinia suberosa (पांगरा) Kydia calycina Lagerstroemia parviflora (लेंडी), Lannea coromandelica Phyllanthus emblica (आवळा) इत्‍यादी शुष्‍क वातावरणातले वृक्ष आढळतात.
झुडुप प्रकारांमध्‍ये देखील काटेरी,लहान पानांची,कमी उंचीची झुडुपे अधिक प्रमाणात आढळतात. Acacia spp. Albizia,Bridelia Montana, Calotropis gigantean,C.procera,Capparis spp.Catunavegam spinosa इत्‍यादी झुडुपे प्रामुख्‍याने आढळतात. Ensete superbum हा जंगली  केळाचा प्रकार तसेच रान हळदीचे प्रकारे, शतावरी या सारख्‍या वनस्‍पतीचा देखील येथे सुकाळ आहे. औषधी वनस्‍पतीच्‍या प्रजाती येथे तुलनेने अधिक सापडतात. गवतांचे प्रकार देखील तुलनेने अधिक आहेत.
३.दक्षिणेकडील गोदावरीचे खोरे
हा भाग जवळ जवळ जंगलरहित असून जमिनीचा बराच भाग शेतीने व्‍यापलेला आहे. Acacia Chundra, A.leucophloea A. nilotica subsp. Albizia procera, Arnona reticulate, A.Squamosa,Capparis zeylanica, Cordia dichotoma, C.Sinensis Dalbergia sissoo, Erythrina suberosa Lannea cooromandelica, Ficus spp. Limonia acidissima, phoenis sylvestris, pongamia pinnata, Mangifera indica, Sapindus emarginatus, Syzygium cummini, Tamarindus indica इत्‍यादी वृक्ष तुरळक आणि विखुरलेलेले आढळतात. त्‍यांच्‍या सोबत Lantana Camara var.aculeata, ची झुडुपे Combretum albidum Tinospora glabra सारख्‍या वेली आणि Andropogon pimilus, Apluda Mutica, Chloris spp.,Chrysopogon fulvas, Dichanthium caricossum, D.pertusum,Digitaria ciliaris, Dinebra retroflexa, Eragrostis spp.Heteropogon contortus, ischaemum pilosum, Iseilema laxum, Thelepogon elegans Themeda Quadrivalvis आणि Trgus roxburghii या सारख्‍या गवताच्‍या प्रजाती आढळतात.
लहान लहान तलाव,तळी,ओली भात शेते या भागात विपुल प्रमाणात आढळतात आणि त्‍यातील वैशिष्‍टपुर्ण वनस्‍पती हे या भागाचे वैशिष्‍टये आहे. येथे सापडणा-या वनस्‍पतीची यादी तळी तलावाभोवती वाढणा-या वनसंपदेमध्‍ये स‍माविष्‍ट केली आहे.
या तीन प्रमुख प्रकारांखेरीज येथील वनसंपदेचे इतर उपप्रकार नांदेड जिल्‍हयात आढळतात. ते खालीलप्रमाणे आहेत.

पडीत जमिनीची वनसंपदा

ज्‍या जमीनी शेती किंवा बागा करण्‍यास निरुपयोगी असतात, त्‍याना पडित जमिनी (Waste lands) असे येथे म्‍हटले आहे. या जमिनी दुर्लक्षित असतात. त्‍यात कच-याचे ढीग,पडीत जमिनी,रस्‍त्‍याकउेच्‍या जमिनी यांचा समावेश करता येईल. अशा जमीनीमध्‍ये Calcium आ‍णि Magnrdium या क्षारांची विपुलता असून नत्राचे प्रमाण अत्‍यल्‍प असते. नांदेड जिल्‍हयात अशा जमीनीवर आढळणा-या या वनस्‍पतीमध्‍ये Abutilon hirtum, Acalypha spp. Acanthospermum hispidum,Agremone Mexicana, Blumea Spp., calotropics gigantean, c. procera, cassia occidentalis, c. sophera, c. tora, cleome gynandra, c. viscose, croton bonplandianum, Datura inoxia, Echinops echinatus, Euphorbia spp., Flaveria trinervia, Kickxia ramosissima, Lactuca runcinata, Lagascea Mollis, Leucas urticifolia, Martynia annua, Opuntia elatior Parthenium hysterophorus, pupalia lappacea, sida spp., Solanum nogrum, s.virginianum,Tribulus terrestris,Tridax procumbens,Vesbascum Chinense, Withania Somnifera Aristida spp., Arthraxon hispidus Chloris virgata,Eragrostis spp.,Eragrostiella brachyphylla, Melanocenchris jacquemontii, Setaria verticillata, Tripogon jacqumontii  इत्‍यादी गवतांच्‍या प्रजाती या प्रामुख्‍याने आढळतात.

खडकाळ जमिनीवारील वनसंपदा

वनस्‍पतीच्‍या कांही प्रजाती अतिशय कमी पाण्‍यावर उदरनिर्वाह करतात.त्‍यांना तशी सवयच लागलेली असतेण्‍ म्‍हणुन त्‍या खडकांच्‍या कपारीतए खडकाळ जमिनीवरील खाच खळगयात राहणे पसंत करतात. उघडया खडकांवर वाढणा-या प्रजातींना Lithophytes आणि खडकांच्‍या कपारीत वाढणा-या प्रजातींना Chasmophytes असे शास्‍त्रीय नाव आहे. अशा वनस्‍पतीची मुळे वरवरच पसरतात सामान्‍य Lithophytes मध्‍ये Aerva lanata, Allmania nodiflora, andrographis echioides, Boerthavia diffusa, Glossocardia bosvallea, justicia gllauca, Lepidagathis trinervis, Oropetium roxburghianum, O.villosulum, Trichuriella Monsoniae, Woodfordia Fruticosa इत्‍यादी प्रजातींचा समावेश होतो.
सामान्‍य Chasmophytes मध्‍ये Anisochilus carnosus, Carallima adscendens, Cyanotis cristata, Drimia Indica, Eragrostiella Brachyphylla, Euphorbia spp., Justicia spp. Kickxia ramosissima, petalidium barlerioides, polycarpaea corymboSA, Trema politoria Tripogon jacquemontii आणि इतर अनेक प्रजातीचा समावेश होतो.


शेतातील तण

पाण्‍याकाठच्‍या तसेच सिंचन क्षेत्राखाली असणा-या जमिनीमध्‍ये शेतमाला बरोबरोच असंख्‍य तण प्रजाती उगवतात आणि कोरडया जमिनीवरील दुष्‍काळावर मात करणा-या प्रजाती आढळुन येतात.
शेतीतील तणांचे खरीप आणि रबी पिकातील तण असे दोन प्रकार सामान्‍यपणे दिसतातण्‍ पण काही प्रजाती कोणत्‍याही पिकांमध्‍ये आढळतात. खरीप पिकांतील तण प्रजाती खरीप पिकांबरोबरच उगवतात आणि त्‍यांच्‍या बरोबरच नाहीशा होतात आणि रबी पिकातील तण प्रजाती पावसाळया अखेर पासून हिवाळा संपेपर्यत दृष्‍टीस पडतात.
अभयारण्‍य - सन १९७१ मध्‍ये शासनाने पैनगंगा अभयारण्‍य घोषीत करण्‍याचा निर्णय घेऊन यवतमाळ जिल्‍हयातील ६ आणि नांदेड जिल्‍यातील २१ असे एकुण २७ गावांचा समावेश पैनगंगा अभयारण्‍याचे कक्षेत करण्‍यात आला होता. त्‍यानुसार नांदेड जिल्‍हयातील २१ गावातील  सर्व जनसामान्‍यांचे हक्‍क व सवलतीबाबत वनजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्‍वये चौकशी करण्‍यासाठी शासनाने १९९२ मध्‍ये उपविभागीय अधिकारी किनवट यांना नियुक्‍त करण्‍यात आले होते. त्‍याप्रमाणे सदर बाबतची चौकशी करुन १९९८ मध्‍ये सदर चौकशी अहवाल शासनास सादर करण्‍यात आला. त्‍यानुसार नांदेड जिल्‍हयातील वनक्षेत्र हे तुटक स्‍वरुपाचे असल्‍याने सदर क्षेत्र हे अभयारण्‍य क्षेत्रातुन निर्वणीकरण करण्‍याचा प्रस्‍ताव शासनास सादर करण्‍यात आला. त्‍यामुळे नांदेड वन विभागातील कोणतेही क्षेत्र सदयस्थितीत पैनगंगा अभयारण्‍याचे कक्षेत कार्यान्‍वीत नाही.
रोपवाटीका – जिल्‍हयात सदयस्थितीत वन विभागाच्‍या ८ रोपवाटीका आहेत. त्‍यामध्‍ये नांदेड वनक्षेत्रातील अर्धापुर रोपवाटीका (क्षेत्र ३०० एकर), भोकर वनक्षेत्रातील भोकर रोपवाटीका (क्षेत्र २.८८ एकर) बोधडी वनक्षेत्रातील सावरी रोपवाटीका (क्षेत्र २.०० एकर), हदगाव वनक्षेत्रातील निवघा रोपवाटीका (क्षेत्र २.०० एकर) हया चार रोपवाटीका मध्‍यवर्ती रोपवाटीका आहेत. इतर रोपवाटीकामध्‍ये मांडवी वनक्षेत्रातील टिटवी रोपवाटीका (क्षेत्र १.०० एकर), इस्‍लापुर वनक्षेत्रातील सहस्‍त्रकुंड रोपवाटीका (क्षेत्र ३.०० एकर), देगलुर वनक्षेत्रातील खैरगाव रोपवाटीका (क्षेत्र १.५० एकर),देगलुर वनक्षेत्रातील बडुर रोपवाटीका (क्षेत्र १.५० एकर) हया आहेत. या सर्व रोपवाटिकामधुन विविध प्रजातीच्‍या रोपांची निर्मिती केली जाते. त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने शिसु (शिसव) ,खैर,बांबू, आवळा, करंज, सीताफळ, शिवन, नीम, बेहडा,बहावा, बोर, शिरस इत्‍यादी वृक्षांच्‍या रोपांची निर्मिती केली जाते.    

 
Top
Feedback