प्रस्‍तावनाः- महसूल प्रशासन लोकाभिमुख होण्‍यासाठी तसेच शासनाच्‍या दैनंदिन कामकाजात पारदर्शकता आणुन महाराष्‍ट्र शासनाच्‍या महसूलाबाबतचे सर्वसाधारण धोरण प्रभावीपणे राबविण्‍याची आवश्‍यकता लक्षात घेऊन गावपातळीपासून जिल्‍हा पातळीपर्यंत जिल्‍ह्यातील महसूल यंत्रणेशी निगडीत कामाचे नियोजन व कार्यपध्‍दतीत आमुलाग्र सुधारणा करण्‍याकरिता नागरिकांची सनद (सिटीजन चार्टर) हा उपक्रम महसूल व वन विभागामार्फत राबविण्‍याचे निश्‍चीत केले प्रमाणे महसूल व वन विभागाच्‍या अधिपत्‍याखालील जिल्‍हा, तालुका कार्यालयात राबविण्‍यात येत असलेल्‍या कामकाजाच्‍या संदर्भात महाराष्‍ट्र शासनाने लोकांच्‍या समस्‍या लवकर सोडविण्‍याचे उद्दीष्‍टाने नागरिकांची सनद योजना राबविण्‍याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्‍याप्रमाणे जनतेला त्‍यांच्‍या कामाबाबत होणारी गैरसोय टाळण्‍यासाठी सदर योजनेची निर्मीती करण्‍यात आली असुन जनतेचे काम विहीत मुदतीच्‍या आत करून घेण्‍याच्‍या हक्‍क ख-या अर्थाने या योजनेव्‍दारे प्राप्‍त झाले आहे. या योजनेच्‍या संकल्‍पनेत जनतेला चांगली सेवा देणे व कायद्याची आणि नियमांची अमंलबजावणी संबंधित अधिका-याव्‍दारे करून पारदर्शक प्रशासनाची खात्री जनतेला करता येईल अशा महत्‍वाच्‍या बाबींचा समावेश प्रस्‍तुत सनदेत करण्‍यात आला आहे.
शासनाकडुन जनतेला विविध प्रकारच्‍या सेवा उपलब्‍ध करून दिल्‍या जातात परंतु त्‍या सेवांची पुरेपूर माहिती सर्वसामान्‍य जनतेला नसते. तसेच या सेवा कमीत कमी वेळात मिळाव्‍यात, त्‍या उचित दर्जाच्‍या असाव्‍यात अशी जनतेची माफक अपेक्षा असत तसेच शासकीय कामकाजात सूधारणा करणे, परदर्शकता आणणे व भ्रष्‍टाचाराला आळा घालून लोकांच्‍या प्रति दायित्‍व वाढविणे, या उद्दीष्‍टांचे पुर्तीकरीता नागरिकांची सनद अंमलात आणण्‍याचे शासनाने सुचविले आहे.
उद्दीष्‍टेः– प्रस्‍तूत योजनेतील उद्दीष्‍ट हे जनतेला कबूल केलेल्‍या तारखेस त्‍यांचे काम पुर्ण करणे हे असून ते साध्‍य करण्‍यासाठी हा उपक्रम शासनस्‍तरावर राबविण्‍यात येत आहे. तसेच लेाकभिमुख महसूल प्रशासन ही संकल्‍पना सर्वसामान्‍य जनतेपर्यंत पोहचवून लोकाभिमुख कामे महसूल व वन विभागामार्फत लवकरात लवकर व्‍हावीत व लोकांच्‍या अडचणी कमी व्‍हाव्‍यात किंवा अडचण येवूच नये यादृष्टिने नागरिकांची सनद हा उपक्रम महाराष्‍ट्र शासनाने सर्व संबंधित अधिका-यामार्फत राबविण्‍याचा निश्‍चीत केले आहे. आपल्‍या जिल्‍ह्यातील सर्व जनतेस ही नागरिकांची सनद पुस्तिका अत्‍यंत उपयुक्‍त होईल, अशी अपेक्षा आहे.


अ.क्र. विभागाकडुन / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा शाखा सेवा पुरविणरा अधिकारी/ कर्मचारी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केल्‍यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल सेवा विहित कालावधीत पुरवली न गेल्‍यास ज्‍यांच्‍याकडे तक्रार करतायेईल तो अधिकारी व त्‍यांचा दूरध्‍वनी क्रमांक
केंद्र व राज्‍य सरकारचे विविध प्रयोजनांसाठी शासकीय व वन जमिनीचे वाटप करणे महसूल शाखा जिल्‍हाधिकारी - विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
शासकीय जमिनीवरील, गायरान जमिनीवरील व वन जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे महसूल शाखा जिल्‍हाधिकारी - विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
ऐपतीचा दाखला (रु. 40 लक्ष च्‍या वर) महसूल शाखा जिल्‍हाधिकारी 15 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
आत्‍मसंरक्षणासाठी / शेती संरक्षणासाठी शस्‍त्र परवाना देणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 3 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
शस्‍त्र वाहतुकीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 10 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
आत्‍मसंरक्षणासाठी / शेती संरक्षण शस्‍त्र परवाना नूतनीकरण करणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 10 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
शस्‍त्र परवान्‍याचे क्षेत्र वाढविणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 3 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
शस्‍त्र खरेदी/ विक्री व्‍यवहारास परवानगी देणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 10 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
शस्‍त्राची नोंद परवान्‍यावर करणे / केलेली नोंद रद्द करणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 10 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
शस्‍त्र खरेदीसाठी मुदतवाढ देणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 10 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
स्फोटक पदार्थांचा साठा करण्‍यासाठी/ वापरण्‍यासाठी परवाने आणि नाहरकत प्रमाणपत्र देणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 3 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
स्‍फोटक परवान्‍यांचे नूतनीकरण करणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 10 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
पेट्रोलीयम पदार्थांचा साठा करण्‍यासाठी/ वापरण्‍यासाठी परवाने आणि नाहरकत प्रमाणपत्र देणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 3 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
शस्‍त्र दुरुस्‍तीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 10 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
मृत परवानाधारक यांची नोंद नोंदवहीत ठेवून साक्षांकीत करून त्‍याबाबत आदेश काढणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 10 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
अनामत शस्‍त्र परवाना मिळण्‍यासाठी परवानगी उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 6 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
विनापरवाना शस्‍त्र बाळगल्‍याबद्दल दोषारोपपत्र न्‍यायालयात सादर करण्‍यासाठी परवानगी देणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 15 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
पूर्व चारित्र्य पडताळणी करणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 1 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
ठोकर देऊन पसार झालेल्‍या अपघातग्रस्‍ताला आर्थीक मदत पुरविणे उपचिटणीस शाखा जिल्‍हा दंडाधिकारी 1 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
चित्रपटगृह परवाना करमणूक कर शाखा अपर जिल्‍हाधिकारी 6 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
केबल परवाना करमणूक कर शाखा अपर जिल्‍हाधिकारी 1 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
व्‍हीडिओ गेम परवाना करमणूक कर शाखा अपर जिल्‍हाधिकारी 1 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
व्हिडीओ खेळगृह परवाना करमणूक कर शाखा अपर जिल्‍हाधिकारी 1 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
पूल पार्लर परवाना करमणूक कर शाखा अपर जिल्‍हाधिकारी 1 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
व्हिडीओ सेंटर परवाना करमणूक कर शाखा अपर जिल्‍हाधिकारी 1 महिने विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
लिपीक, वाहनचालक, शिपाई यांच्‍या नियुक्‍त्‍यांबाबत कार्यवाही करणे आस्‍थापना शाखा जिल्‍हाधिकारी शासन आदेशाप्रमाणे विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
नोकरी मिळणेसाठी उमेदवारांकडून येणा-या अर्जांवर कार्यवाही करणे किंवा त्‍यांना उत्‍तर देणे आस्‍थापना शाखा जिल्‍हाधिकारी 45 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
भोगवटदार वर्ग-२ च्‍या जमिनींचे हस्‍तांतरण भूसुधार शाखा उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) 30 ते 45 दिवस जिल्‍हाधिकारी
प्रकल्‍पग्रस्‍तांना दाखला देणे पुनर्वसन शाखा उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन 7 दिवस जिल्‍हाधिकारी
प्रकल्‍पग्रस्‍ताची ज्‍येष्‍ठता यादीमध्‍ये नावनोंदणी करणे पुनर्वसन शाखा उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन 7 दिवस जिल्‍हाधिकारी
प्रकल्‍पग्रस्‍त दाखला हस्‍तांतरण प्रमाणपत्र देणे पुनर्वसन शाखा उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन 7 दिवस जिल्‍हाधिकारी
इतर जिल्‍ह्यात नावनोंदणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे पुनर्वसन शाखा उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन 7 दिवस जिल्‍हाधिकारी
कलम 11 नुसार बंदी असलेल्‍या भागात हस्‍तांतरण, विभागणी, पोट विभागणी वाटपाची परवानगी देणे पुनर्वसन शाखा जिल्‍हाधिकारी 15 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
निर्बंधित गावातील क्षेत्राच्‍या विक्रीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे पुनर्वसन शाखा उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन 7 दिवस जिल्‍हाधिकारी
प्रकल्‍पग्रस्‍तांना भूखंड वाटप करणे पुनर्वसन शाखा उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन 3 महिने जिल्‍हाधिकारी
पर्यायी शेतजमीन वाटप करणे पुनर्वसन शाखा उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन 3 महिने जिल्‍हाधिकारी
पुनर्वसित गावठाणात नागरी सुविधा पुरविणे पुनर्वसन शाखा उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन - जिल्‍हाधिकारी
गौणखनिज उत्‍खनन परवाना देणे गौणखनिज शाखा अपर जिल्‍हाधिकारी 30 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
गौणखनिज उत्‍खननासाठी 5 वर्षे मुदतीचा खाणपट्टा मंजूर करणे व नूतनीकरण करणे गौणखनिज शाखा अपर जिल्‍हाधिकारी 90 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
खाजगी जमिनीचे भूसंपादन करणे भूसंपादन उपजिल्‍हाधिकारी, भूसंपादन 3 वर्षे जिल्‍हा न्‍यायालय
कागदपत्रांच्‍या प्रमाणित प्रती (सहिसूद नक्‍कल) देणे अभिलेख शाखा अ.का. 7 दिवस जिल्‍हाधिकारी
मतदार यादी पुनरिक्षण निवडणूक शाखा जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा निवडणूक अधिकारी भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्‍या कार्यक्रमानुसार मुख्‍य निवडणूक अधिकारी, सामान्‍य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई फोनः 022-22025059 फॅक्‍स 022-22835698 हेल्‍पलाईन 1800221950 (टोलफ्री) ईमेल -ceo_maharashtra@eci.gov.in
मतदारांना छायाचित्र ओळखपत्र देणेबाबत कार्यक्रम राबविणे निवडणूक शाखा जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा निवडणूक अधिकारी भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्‍या कार्यक्रमानुसार मुख्‍य निवडणूक अधिकारी, सामान्‍य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई फोनः 022-22025059 फॅक्‍स 022-22835698 हेल्‍पलाईन 1800221950 (टोलफ्री) ईमेल -ceo_maharashtra@eci.gov.in
रिक्‍त सरपंच पदे भरणे जि.प./ग्रा.पं. निवडणूक शाखा जिल्‍हाधिकारी 15 दिवस विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
नाफ्ता/ सॉल्‍व्‍हंट परवाने मंजूर करणे पुरवठा शाखा जिल्‍हा‍ दंडाधिकारी 1 महिना विभागीय आयुक्‍त, औरंगाबाद
फ्रीसेल केरोसीन विक्री परवाना देणे पुरवठा शाखा जिल्‍हा पुरवठा अधिकारी 1 महिना जिल्‍हाधिकारी
रास्‍त भाव धान्‍य दुकान परवाना पुरवठा शाखा जिल्‍हा पुरवठा अधिकारी 2 महिने जिल्‍हाधिकारी
किरकोळ केरोसीन विक्रीपरवाना पुरवठा शाखा जिल्‍हा पुरवठा अधिकारी 2 महिने जिल्‍हाधिकारी
रास्‍त भाव धान्‍य दुकान परवाना नूतनीकरण करणे पुरवठा शाखा जिल्‍हा पुरवठा अधिकारी 1 महिना जिल्‍हाधिकारी
केरोसीन घाऊक / अर्धघाऊक परवाना नूतनीकरण पुरवठा शाखा जिल्‍हा पुरवठा अधिकारी 1 महिना जिल्‍हाधिकारी
अकृषिक परवानगी (मा.जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे आदेश क्रं.आरबी/कार्या२/जमाबंदी/सिआर ६३ दि.१३.१२.१९८८ व क्रं२०१०/मशाका२/जमा/प्रक्रं.२/२/५८ दि.०४.०२.२०१२ अन्‍वये) उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी ९० दिवस जिल्‍हाधिकारी
गौण खनिज परवाना उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी ०७ दिवस जिल्‍हाधिकारी
झाडतोड, परवानगी अधिसुचीत झाडा व्‍यतिरिक्‍त उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी ३० दिवस जिल्‍हाधिकारी
जातीचे दाखले उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी १५ दिवस जिल्‍हाधिकारी
नॉनक्रिमीलेअर दाखले उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी १५ दिवस जिल्‍हाधिकारी
शस्‍त्र नुतनीकरण परवाना (फक्‍त बंदुक उ.वि.अ. कार्यालयात नोंद असलेले ) उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी क १५ दिवस जिल्‍हाधिकारी
एैपत दाखला (रू.०८ लक्ष ते ४० लक्ष) उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी क १५ दिवस जिल्‍हाधिकारी
पासपोर्टसाठी व्‍हेरीफीकेशन उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी ०७ दिवस जिल्‍हाधिकारी
वृत्‍तपत्र शिर्षक नोंदणी उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी ०७ दिवस जिल्‍हाधिकारी
भुसंपादन दाखला (उपविभागीय अधिकारी यांनी जाहिर केलेल्‍या निवाडयासंबंधी ) उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी १५ दिवस जिल्‍हाधिकारी
नवीन कौंटुबिक शिधापत्रीका तहसिल कार्यालय तहसिलदार १५ दिवस जिल्‍हा पुरवठा अधिकारी
रदद् प्रमाणपत्रा आधारे नविन कौटुंबिक शिधापत्रीका मिळणे बाबत तहसिल कार्यालय अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी/ तहसिलदार ०७ दिवस जिल्‍हा पुरवठा अधिकारी
कौटुंबिक शिधापत्रीकेत नांव समाविष्‍ट करणे तहसिल कार्यालय अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी/ तहसिलदार ०७ दिवस जिल्‍हा पुरवठा अधिकारी
व्दितीय शिधापत्रीका मिळणे बाबत तहसिल कार्यालय अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी/ तहसिलदार ०७ दिवस जिल्‍हा पुरवठा अधिकारी
कौटुंबिक शिधापत्रीकेत नांव कमी करणे किंवा रद्द करणे तहसिल कार्यालय अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी/ तहसिलदार ०३ दिवस जिल्‍हा पुरवठा अधिकारी
शिधापत्रीका नुतनीकरण तहसिल कार्यालय अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी/ तहसिलदार ०७ दिवस जिल्‍हा पुरवठा अधिकारी
विभक्‍त शिधापत्रीका मिळणे बाबत तहसिल कार्यालय अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी/ तहसिलदार १५ दिवस जिल्‍हा पुरवठा अधिकारी
कुळ कायदा कलम ४३ अन्‍वये विक्री परवानगी बाबत तहसिल कार्यालय तहसिलदार ३० दिवस उपविभागीय अधिकारी
गौणखनिज परवाना ५०० ब्रास तहसिल कार्यालय तहसिलदार ४५ दिवस उपविभागीय अधिकारी
वय / राष्‍ट्रीयतवाचे प्रमाणपत्र तहसिल कार्यालय तहसिलदार ०७ दिवस उपविभागीय अधिकारी
ऐपत दाखला (रू.५०,०००/- ते २.०० लक्ष पर्यंत) तहसिल कार्यालय तहसिलदार ०७ दिवस उपविभागीय अधिकारी
अधिवास दाखला तहसिल कार्यालय तहसिलदार ०७ दिवस उपविभागीय अधिकारी
जेष्‍ठ नागरीक दाखला तहसिल कार्यालय तहसिलदार ०७ दिवस उपविभागीय अधिकारी
हॉटेल परवाना (मनपा क्षेत्र वगळुन ) तहसिल कार्यालय तहसिलदार ३० दिवस उपविभागीय अधिकारी
सिनेमा व्‍यतिरिक्‍त इतर मनोरंजन कार्यक्रम परवानगी तहसिल कार्यालय तहसिलदार प्रकार निहाय ०८ ते ४५ दिवस उपविभागीय अधिकारी
शेतकरी असल्‍याचा दाखला तहसिल कार्यालय तहसिलदार ०७ दिवस उपविभागीय अधिकारी
फाटलेल्‍या/ खराब झालेल्‍या शिधापत्रीका देण्‍याऐवजी दुय्यम शिधापत्रीका देणे तहसिल कार्यालय तहसिलदार चौकशी अंती १० दिवस उपविभागीय अधिकारी
संजय गांधी निराधार योजना तहसिल कार्यालय तहसिलदार ०३ महिने उपविभागीय अधिकारी
श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना तहसिल कार्यालय तहसिलदार ०३ महिने उपविभागीय अधिकारी
इंदीरा गांधी राष्‍ट्रीय वृधापकाळ/ विधवा / अपंग निवृत्‍ती वेतन योजना तहसिल कार्यालय तहसिलदार ०३ महिने उपविभागीय अधिकारी
राष्‍ट्रीय कुटंब लाभ योजना तहसिल कार्यालय तहसिलदार ०१ महिने उपविभागीय अधिकारी
पाईप लाईन परवानगी तहसिल कार्यालय तहसिलदार ३० दिवस उपविभागीय अधिकारी
धारण जमीन विभाजन तहसिल कार्यालय तहसिलदार ४५ दिवस उपविभागीय अधिकारी
जन्‍म/मृत्‍यु नोंदीबाबत आदेश तहसिल कार्यालय तहसिलदार ०७ दिवस उपविभागीय अधिकारी
स्‍थानिक वास्‍तवाचा दाखला तहसिल कार्यालय तहसिलदार ०७ दिवस उपविभागीय अधिकारी
 
Top