महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2001 नुसार  राज्यातील प्रत्येक जिल्ह्राच्या ठिकाणी विविध खेळांच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्याकरीता जिल्हा क्रीडा संकुलाची स्थापना, व त्याच प्रमाणे तालुका हा मुख्य घटक धरण्यात आला असून तालुका स्तरावर तालुका क्रीडा संकुल यामध्ये विविध खेळांच्या किमान सुविधा उपलब्ध करुन देणे.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्यांसाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे हे जाणून सन 2012 मध्ये राज्याचे नविन क्रीडा धोरण जाहीर करण्यांत आले असून या नविन क्रीडा धोरणात क्रीडा विद्यापीठ, राज्य क्रीडा प्रशिक्षण शिबीर आयोजन, अंतरराष्ट्रीय खेळाडूंना अर्थसहाय्य, अपघात व ईजा झाल्यास वैद्यकीय उपचारासाठी सहाय्य व विदेशात क्रीडा प्रशिक्षण इत्यादी बाबीचा विचार करुन राज्याचे नविन क्रीडा धोरण तयार करण्यांत आले आहे.
राज्यामध्ये क्रीडा विषयक पयाभूत सुविधांची निर्मीती करण्यांकरीता जिल्हयामध्ये 1) तालुका क्रीडा संकुल 2) जिल्हा क्रीडा संकुल निर्माण करण्यात येत आहे.
.
जिल्हा क्रीडा संकुलातील पुर्ण झालेल्या क्रीडा सुविधा
1.जिम्नॅशियम हॉल (इनडोअर हॉल) - जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अद्यावत असे बहूउद्देशिय हॉलचे बांधकाम जूलै, 2004 मध्ये पुर्ण करण्यात आले असून सदर हॉलमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय बॅडमिंटन, बास्केटबॉल व टेबल टेनिस स्पर्धा दरवर्षी यशस्वीपणे आयोजन करण्यात येत आहे.
2.क्रीडा वसतीगृह सुविधा - जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सर्व सोयीयुक्त वसतिगृहामध्ये 2 बेडसह 44 खोल्यांचे बांधकाम पुर्ण झालेले असून सद्यस्थित मध्ये वापरासाठी सुव्यवस्थीत उपलब्ध आहेत. शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाकडुन आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा व संघटनेकडुंन आयोजित क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा संकुल समिती, नांदेड यांनी निश्चित केलेल्या सवलतीच्या दरानूसार सदर वसतीगृह खेळाडूंसाठी व इतर उपक्रमासांठी उपलब्ध करुन दिले जाते.
3.बास्केटबॉल कोर्ट - जिल्हा क्रीडा संकुलामध्ये दोन आंतराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल कोर्ट बांधकाम पुर्ण करण्यात आले असून बास्केटबॉल कोर्टचा वापर बॉस्केटबॉल संघटनेस सराव करणे करीता नाममात्र भाडे आकारुन उपलब्ध करुन दिले जात आहे.
4.स्केटींग रिंग - जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अद्यावत स्केटींग रिंग चे बांधकाम करण्यात आले असून जिल्हा स्केटींग संघटने मार्फत नियमीत 70 ते 80 खेळाडू सराव घेत आहेत.

जिल्ह्रातील एकुण 16 तालुका क्रीडा संकुलाची संक्षिप्त माहिती.
नांदेड जिल्हयामध्ये एकुण 16 तालुका क्रीडा संकुला पैकी 14 तालुका क्रीडा संकुलास जागा प्राप्त झाली असून उर्वरीत 2 तालुका क्रीडा संकुल करीता जागा प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे.  

1. तालुका क्रीडा संकुल,अर्धापुर
तालुका क्रीडा संकुल करीता 1 सप्टेंबर,2010 रोजी महसूल विभागाकडूंन 2.00 हेक्टर जागा प्राप्त असून सदर संकुलामध्ये बहूउद्देशीय इनडोअर हॉल, 200 मी.धावनपथ व विविध खेळाचे मैदानचे काम 100 टक्के पुर्ण झाले आहे.
2. तालुका क्रीडा संकुल (सिडको) नांदेड
तालुका क्रीडा संकुल, (सिडको) नांदेड करिता श्री शारदा भुवन एज्यूकेशन सोसायटी नांदेड यांची 2 हेक्टर जागा त्रिपक्षिय करारनामा करुन जानेवारी 2010 मध्ये तालुका क्रीडा संकुल समितीस देण्यात आली आहे. सदर तालुका क्रीडा संकुल हॉलचे काम पुर्ण झालेले आहे.
3. तालुका क्रीडा संकुल, मुदखेड -
तालुका क्रीडा संकुलासाठी नगरपरिषद, मुदखेड ची 2 हे.01 आर जागा प्राप्त असून तालुका क्रीडा संकुल मध्ये इनडोअर हॉल, 200 मी.धावनपथ व विविध खेळाची मैदाने हया कामाचे उद्घाटन दिनांक 10 फेब्राुवारी,2013 रोजी झाले. सदर सुविधा तालुक्यातील खेळाडूं, जेष्ट नागरीक यांना नाममात्र शुल्क आकारुन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
4. तालुका क्रीडा संकुल, किनवट.
तालुका क्रीडा संकुल किनवट येथे राष्ट्रीय सम विकास योजनेमधून मिनी इनडोअर बांधकामाकरीता एकुण मंजूर निधी 22.00 लक्ष मधून इनडोअर हॉलचे काम पुर्ण झाले आहे.  तसेच व्यायाम शाळेचे अधूनिकीकरण करण्यांत आले असून तालुक्यातील खेळाडूं, नगरीक नियमीत व्यायामचे सराव करीता आहे.
5. तालुका क्रीडा संकुल, देगलूर
तालुका क्रीडा संकुल, देगलुर करिता नगर परिषद देगलूर यांची 1 हे.60 आर जमिन प्राप्त आहे. तालुका क्रीडा संकुलामध्ये इनडोअर हॉलचे काम पुर्ण झाले असून हॉल समितिच्या ताब्यात आहे.  200 मी. धावनपथ, इनडोअर हॉल, व्हॉलीबॉल-1 मैदान, कबड्डी-2 मैदान व खो-खो-1 इत्यादी सुविधा सन 2012-13 मध्ये पुर्ण करण्यांत आले असून तालुक्यातील खेळाडूं, क्रीडा प्रेमी, जेष्ठ नागरीक यांच्याकडून या सुविधेचा वापर करण्यांत येत आहे.
6. तालुका क्रीडा संकुल, कंधार -
तालुका क्रीडा संकुल, या कामाची उभारणी करण्यासाठी श्री शिवाजी महाविद्यालय, कंधार या संस्थेची कंधार येथील 1 हेक्टर 60 आर जागा सामंजस्य करारनामा करुन क्रीडा संकुल समितिच्या ताब्यात देण्यात आली असून त्या ठीकाणी क्रीडा संकुल उभारण्याचे प्रस्तावित आहे.

7. तालुका क्रीडा संकुल, लोहा.
तालुका क्रीडा संकुल, लोहा करीता गट क्रं.126 मधील 1 हेक्टर 60 आर शासकीय जागा संकुल समितिच्या ताब्यात आहे. सदर संकुलामध्ये सन 2001-02 मध्ये प्रशासकिय इमारतीचे काम पूर्ण झाले असून तालुका क्रीडा संकुल बॅडमिंटन इनडोअर हॉलचे अर्धवट राहीलेले काम प्रगतीपथावर आहे.

8. तालुका क्रीडा संकुल, मुखेड.
तालुका क्रीडा संकुल मुखेड करीता क्रीडा व युवक सेवा विभागाकडूंन 200 मी. धावनपथ व इनडोअर हॉलची कामे पुर्ण झालेली आहेत.
9. तालुका क्रीडा संकुल, धर्माबाद.
तालुका क्रीडा संकुल, धर्माबाद येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद विद्यालयाची 1 हे.60 आर. जागा सामंजस्य करारनामा करुन जागा घेण्यात आली असून सदर तालुका क्रीडा संकुल येथील कामे प्रगती पथावर आहेत.
10. तालुका क्रीडा संकुल, हदगांव.
मौ.हदगांव येथील सव्र्हे क्रं.223, 224 व 225 येथील 2 हेक्टर 42 आर. शासकीय गायरान जागा प्राप्त असून सदर कामे प्रगती पथावर आहेत.
11. तालुका क्रीडा संकुल, भोकर -
तालुका क्रीडा संकुलासाठी शहरालगतची शासकीय जागेची पाहणी करुन सर्वे क्र 386 व 365 मधील 5 पाच एक्कर जागा महसूल वभागाकडूंन तालुका क्रीडा संकुल समितिस प्राप्त करुन देण्यात आली आहे. सदर कामे प्रगती पथावर आहेत
12. तालुका क्रीडा संकुल, उमरी.
मौ.उमरी ता.क्री.सं. करीता सव्र्हे नं.12 मधील क्षेत्र 1.50 हेक्टर आर शासकीय गायरान जागा प्राप्त झाली असून कार्यकारी अभियंता, सा.बा.विभाग,नांदेड यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रक व आराखडे यास संचालनालयाची प्रशासकीय व तांत्रीक मान्यता प्राप्त आहे. सदर जागेवर लवकरच कामे सुरु करण्याची कार्यवाही चालू आहे.
13. तालुका क्रीडा संकुल, नायगांव.
तालुका क्रीडा संकुल, मौ.नायगांव (खै) करीता सरकारी गायरान जमीन गट क्रं.121 मधील क्षेत्र 2.00 हेक्टर आर. जागा प्राप्त असून सदर कामाचे अंदाजपत्रक व आराखडे रु 109.00 हे प्रशासकीय व तांत्रीक मान्यतेकरीता मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांच्याकडे दिनांक 03.03.2014 रोजी पाठविण्यंात आले आहे. अद्यापपर्यंत निधी अप्राप्त आहे.
14. तालुका क्रीडा संकुल, बिलोली.
तालुका क्रीडा संकुल उभारणी करण्यासाठी नगरपरीषद,बिलोली यांची मौ.बिलोली येथील सव्र्हे क्रं.153 मधील क्षेत्र 2 हेक्टर 22 आर.जागा सामंजस्य करारनामा दिनांक 12.01.2015 रोजी करण्यांत आलेला असून सदर जागेची मोजणी मा.उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय यांच्या मार्फत करण्यांत आली असून जागेचा ताबा घेण्याची कार्यवाही चालू आहे.
15. तालुका क्रीडा संकुल, माहूर.
तालुका क्रीडा संकुल,मौ.माहूर येथे तालुका क्रीडा संकुल करीता ग्रामपंचायतची जागा प्राप्त असून सदरील जागा असमतोल असल्यामूळे माहूर तालुका क्रीडा संकुलाचा रु 20.00 लक्ष निधी तालुका क्रीडा संकुल, किनवट करीता वर्ग करण्यांत आलेला आहे. मा.तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करुन त्याच ठिकाणी संकुलाचे बांधकाम करणे बाबत अथवा तालुका क्रीडा संकुल करीता माहूर येथील जागा मोजणी बाबतची कार्यवाही सुरु आहे.

16. तालुका क्रीडा संकुल, हिमायतनगर.
मौ.हिमायतनगर येथील शासकिय जागा पाहणी केली असून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अबकड प्रस्ताव मा.तहसिलदार यांच्याकडे सादर केला आहे. सव्र्हे नं.83 पैकी 0 हेक्टर 055 आर व 84 पैकी  0 हेक्टर 20 आर. अशी एकुण 75 आर.जागा प्राप्त आहे. परंतू सदरची जागा अपूरी आहे याबाबत लगत जागेचे मालक श्री.कात्रे, खाजगी शेतकरी व श्री.पींचा व्यापारी यांनी उर्वरीत 2 एकर जागा देण्यास मौखीक मान्यता दिली असून याबाबत कार्यवाही चालू आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड

राज्य शासकीय यंत्रणांकडून जिल्हा वार्षिक योजनेमधील ग्रामीण व शहरी
भागात राबविण्यात येण्याऱ्या क्रीडांगण विकास योजनांची माहिती 2015-16

1. विकास उपशिर्ष :-- क्रीडा व युवक कल्याण
योजनेचे नांव :-- क्रीडांगण विकास / तालुकास्तरावर प्रेक्षागार बांधणे.
योजनेची माहिती :
ग्रामीण, नागरी व आदिवासी भागात क्रीडा विषयक क्रीडांगण विकासअतंर्गत क्रीडांगणास कुंपण घालणे, 400 व 200 मीटर धावनपट्टी तयार करणे, क्रीडांगण समपातळीत करणे, विविध खेळांची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधकाम करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, क्रीडांगणा भोवती संरक्षण भिंत बांधकाम / तारेचे कुंपण घालणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर फलड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती प्रेक्षक गॅलरी तयार करणे, गॅलरीवर शेड तयार करणे, मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे अशा प्रकारची कामे घेण्यात येतात.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे नविन शासन निर्णय क्रं.क्रीडाधो-3113/प्र.क्रं.48/ क्रीयुसे-3 दिनांक 13 फेब्राुवारी, 2014 अन्वये अंदाजित खर्चाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त    रु. 7.00 लक्ष यापैकी कमी असले इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येते. विशेष घटक योजनेंसाठी शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीच्या गावांतील आणि आदर्श गावांतील तसेच शासनाने घोषित केलेल्या आदिवासी भागातील पात्र संस्थाना अंदाजित खर्चाच्या 90 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष यापैकी कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येते. संस्थेने स्वत:चा हिस्सा म्हणुन अनुदानाच्या किमान 25 टक्के रक्कम खर्च करणे आवश्यक आहे.
सदरील अनुदान मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, पंजिबध्द क्रीडा संस्थांना त्यांनी मंजूर करुन घेतलेल्या कामासाठी अंदाजित खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.7.00 लक्ष यापैकी कमी असेल इतके अनुदान दोन हप्त्यात देण्यात येते सदर अनुदानित संस्थेद्वारा अनुदान इतकी रक्कम खर्च करण्यात अटीसह दिली जाते तसेच आदिवासी भागातील खाजगी संस्थाना अनुदान म्हणुन 2 हप्त्यामध्ये देण्यात येते. याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणा­या शासकीय आश्रम शाळांना प्रत्येक बाबींकरीता 100 टक्के अनुदान परंतु कमाल रु.7.00 लक्ष इतके अनुदान देण्यात येते हे अनुदान खाजगी शैक्षणिक संस्थेद्वारा चालविण्यात येणा­या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच विविध खेळांच्या विकासासाठी कार्यरत असणारी विश्वस्त क्रीडा मंडळे, युवक मंडळे व महिला मंडळे यांना देण्यात येते. शासनाच्या नविन निर्णयानुसार सदरचे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत चालविण्यात येणा­या प्राथमिक , माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांना देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज करावयाचा असून त्याप्रमाणे प्रस्तावाची छाणणी व तपासणी करुन प्रस्तावास विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांची तांत्रीक मान्यता घ्यावी व त्यानूसार पात्र संस्थाना अंतिम प्रशासकीय मान्यता देण्यचे अधिकार मा.जिल्हाधिकारी यांना राहतील. या योजने करीता सबंधीत जिल्हयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना आहरंण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषीत करण्यांत आलेले आहे.
प्रस्तावास तांत्रीक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर सबंधीत संस्थेस स्वत:चा 25 टक्के हिस्सा खर्च करण्यंाबाबत कळविले जाते. व संस्थेचा हिस्सा खर्च झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम धनाकर्षाद्वारे संस्थेला निधी उपलब्ध करुन दिला जातो.

2 विकास उपशिर्ष :-- क्रीडा व युवक कल्याण
योजनेचे नांव :-- क्रीडांगण विकास / तालुकास्तरावर प्रेक्षागार बांधणे.
योजनेची माहिती :
ग्रामीण, नागरी व आदिवासी भागात क्रीडा विषयक क्रीडांगण विकासअतंर्गत क्रीडांगणास कुंपण घालणे, 400 व 200 मीटर धावनपट्टी तयार करणे, क्रीडांगण समपातळीत करणे, विविध खेळांची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधकाम करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, क्रीडांगणा भोवती संरक्षण भिंत बांधकाम / तारेचे कुंपण घालणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर फलड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती प्रेक्षक गॅलरी तयार करणे, गॅलरीवर शेड तयार करणे, मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे अशा प्रकारची कामे घेण्यात येतात.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे नविन शासन निर्णय क्रं.क्रीडाधो-3113/प्र.क्रं.48/ क्रीयुसे-3 दिनांक 13 फेब्राुवारी,2014 अन्वये अंदाजित खर्चाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष यापैकी कमी असले इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येते. विशेष घटक योजनेंसाठी शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीच्या गावांतील आणि आदर्श गावांतील तसेच शासनाने घोषित केलेल्या आदिवासी भागातील पात्र संस्थाना अंदाजित खर्चाच्या 90 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष यापैकी कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येते. संस्थेने स्वत:चा हिस्सा म्हणुन अनुदानाच्या किमान 25 टक्के रक्कम खर्च करणे आवश्यक आहे.
सदरील अनुदान मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, पंजिबध्द क्रीडा संस्थांना त्यांनी मंजूर करुन घेतलेल्या कामासाठी अंदाजित खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.7.00 लक्ष यापैकी कमी असेल इतके अनुदान दोन हप्त्यात देण्यात येते सदर अनुदानित संस्थेद्वारा अनुदान इतकी रक्कम खर्च करण्यात अटीसह दिली जाते तसेच आदिवासी भागातील खाजगी संस्थाना अनुदान म्हणुन 2 हप्त्यामध्ये देण्यात येते. याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणा­या शासकीय आश्रम शाळांना प्रत्येक बाबींकरीता 100 टक्के अनुदान परंतु कमाल रु.7.00 लक्ष इतके अनुदान देण्यात येते हे अनुदान खाजगी शैक्षणिक संस्थेद्वारा चालविण्यात येणा­या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच विविध खेळांच्या विकासासाठी कार्यरत असणारी विश्वस्त क्रीडा मंडळे, युवक मंडळे व महिला मंडळे यांना देण्यात येते. शासनाच्या नविन निर्णयानुसार सदरचे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत चालविण्यात येणा­या प्राथमिक , माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांना देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज करावयाचा असून त्याप्रमाणे प्रस्तावाची छाणणी व तपासणी करुन प्रस्तावास विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांची तांत्रीक मान्यता घ्यावी व त्यानूसार पात्र संस्थाना अंतिम प्रशासकीय मान्यता देण्यचे अधिकार मा.जिल्हाधिकारी यांना राहतील. या योजने करीता सबंधीत जिल्हयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना आहरंण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषीत करण्यांत आलेले आहे.
प्रस्तावास तांत्रीक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर सबंधीत संस्थेस स्वत:चा 25 टक्के हिस्सा खर्च करण्यंाबाबत कळविले जाते. व संस्थेचा हिस्सा खर्च झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम धनाकर्षाद्वारे संस्थेला निधी उपलब्ध करुन दिला जातो.

3 विकास उपशिर्ष :-- क्रीडा व युवक कल्याण
योजनेचे नांव :-- व्यायामशाळा विकास.
योजनेची माहिती :
समाजातील सर्व घटकांचा सर्वांगिण शारीरिक विकास साधण्यासाठी व्यायामशाळेंची सुविधा उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेतंर्गत जी क्रीडा मंडळे / व्यायाम संस्था / तालमी 1860 च्या संस्था नोंदणी अधिनियमाखाली आणि अथवा 1950 च्या सार्वजनिक विश्वस्त अधिनियमाखाली नोंद झाली आहे अशा व्यायामसंस्था, क्रीडामंडळे व महिला मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थ, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद इत्यादी संस्थाना अनुदान देण्यात येते. सदरील संस्थेकडे स्वत:च्या मालकीची किंवा दीर्घ मुदतीच्या करारावर (30 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक) व्यायामशाळा बांधकामासाठी जागा असणे आवश्यक आहे. या योजनेतर्गंत किमान 500 चौ.फुट चटई क्षेत्र व्यायामगृह, स्नानगृह, भांडारगृह, इ. बाबींच्या बांधकामासाठी तसेच तसेच जुन्या नव्या व्यायामशाळा आखाडे तालमी यांच्या नुतनीकरणासाठी या शिवाय संस्थेकडे व्यायामशाळा उपलब्ध असेल तर व्यायामशाळेसाठी अत्याधुनिक साहित्य खरेदी करण्यासाठी खालील प्रमाणे अनुदान देण्यात येते.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे नविन शासन निर्णय क्रं.क्रीडाधो-3113/प्र.क्रं.39/क्रीयुसे-3 दिनांक 22 जानेवारी,2014 अन्वये अंदाजित खर्चाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष यापैकी कमी असले इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येते. विशेष घटक योजनेंसाठी शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीच्या गावांतील आणि आदर्श गावांतील तसेच शासनाने घोषित केलेल्या आदिवासी भागातील पात्र संस्थाना अंदाजित खर्चाच्या 90 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.7.00 लक्ष यापैकी कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येते. संस्थेने स्वत:चा हिस्सा म्हणुन अनुदानाच्या किमान 25 टक्के रक्कम खर्च करणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज करावयाचा असून त्याप्रमाणे प्रस्तावाची छाणणी व तपासणी करुन प्रस्तावास विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांची तांत्रीक मान्यता घ्यावी व त्यानूसार पात्र संस्थाना अंतिम प्रशासकीय मान्यता देण्यचे अधिकार मा.जिल्हाधिकारी यांना राहतील. या योजने करीता सबंधीत जिल्हयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना आहरंण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषीत करण्यांत आलेले आहे.
प्रस्तावास तांत्रीक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर सबंधीत संस्थेस स्वत:चा 25 टक्के हिस्सा खर्च करण्यंाबाबत कळविले जाते. व संस्थेचा हिस्सा खर्च झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम धनाकर्षाद्वारे संस्थेला निधी उपलब्ध करुन दिला जातो.

4विकास उपशिर्ष :-- क्रीडा व युवक कल्याण
योजनेचे नांव :-- सामाजिक सेवा शिबीरे / ग्रामीण व नागरी भागातील स्वयंसेवी युवक मंडळांना आर्थिक सहाय्य.
योजनेची माहिती :
ग्रामीण व नागरी भागातील स्वयंसेवा संस्था सातत्याने कार्यरत राहण्यासाठी त्यांना या योजनातर्गंत दर वर्षी अर्थसहाय्य दिले जाते. विविध उपक्रमाद्वारे राष्ट्र उन्नती व सामाजिक विकास करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 15 ते 35 वयोगटातील वकृत्त्व स्पर्धा, आयोजित करण्यात येतात. त्याशिवाय वृक्षारोपन, रक्तदान, व्यसनमुक्ती यांची शिबीरे आयोजित केली जातात. त्यासाठी या योजनेतंर्गत युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणा­या पंजीबध्द संस्थाना अंदाजित खर्चाच्या 50 टक्के किंवा रु. 25,000/- या पैकी कमी असेल इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे अर्ज करावयाचा असून त्या प्रस्तावांची छाननी करुन सदरील प्रस्ताव मंजुरीकरीता मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातुर विभाग लातुर यांच्याकडे सादर करण्यात येतो व त्यांचेकडून मान्यता मिळाल्यानंतर सबंधित संस्थाना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून निधी उपलब्ध करुन दिला जातो.

5विकास उपशिर्ष :-- क्रीडा व युवक कल्याण
योजनेचे नांव :-- जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र / तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र.
योजनेची माहिती :
ग्रामीण, नागरी व आदिवासी भागातील खेळाडू विद्याथ्र्यांना जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र मार्फत व तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्रामार्फत मैदानी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक, तायक्वाँदो, आर्चरी, बास्केटबॉल, स्केटींग, सॉफटबॉल्, पॉवरलिफटींग, कराटे, ज्युदो, कबड्डी, खो-खो, चॉयक्वाँदो इत्यादी खेळांची प्रशिक्षण शिबीरे आयोजीत केली जातात. सदरील शिबीरार्थीना तज्ञ मार्गदर्शकाद्वारे मोफत प्रशिक्षण दिले जाते. व खेळासाठी लागणारे आवश्यक साहित्य, क्रीडांगण व सकस आहार दिला जातो. या योजनेचा लाभ जिल्हयातील खेळाडूं, क्रीडा संघटना व क्रीडा प्रेमींना दिला जातो.

Top
Feedback