दररोज प्रत्येक कर्मचाऱ्यामार्फत शासन निर्णयांचे वाचन

तहसील कार्यालय नायगाव (खैरगाव)

26 नोव्हेंबर 2014 रोजी संविधान दिनांकापासुन तहसिल कार्यालय नायगांव (खै.) येथे शासन निर्णय वाचन कार्यक्रमास सुरुवात करण्याचा संकल्प केला व सदरचा यशस्वी कार्यालयात चालु आहे. तसेच कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी यांना प्रत्येक शाखेच्या शासन निर्णयाचे ज्ञान होण्यास्तव सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन कार्यालयात करण्यांत येत आहे.


शासन निर्णय वाचन कार्यक्रमाचे उद्देश

  1. प्रत्येक शासकीय कर्मचा-यास नवीन येणा-या व जुन्या महत्वपुर्ण शासन निर्णयाचे ज्ञान व्हावे.

  2. प्रत्येक शासकीय कर्मचारी ह्याचे ज्ञान स्वताच्या शाखेपुरते मर्यादीत न राहता त्याच्या ज्ञानात सर्व शाखा कामकाजविषयक भर पडावा.

  3. कार्यालयातील प्रत्येक कर्मचा-यास सर्व कर्मचारी यांचे समोर शासन निर्णय समजुन सांगता यावा यासाठी त्यांच्यात सभाधिटता यावी.

  4. तसेच चर्चात्मक संवाद करता यावा व ज्ञानात भर पडावी.

  5. शासन निर्णय वाचना अभावी कोणतेही चुकीचे काम कर्मचारी/अधिकारी यांचे कडुन होऊ नये.

  6. शासन निर्णय वाचनाच्या उद्देशाने सर्व कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थीत राहतात.


शासन निर्णय वाचन कार्यक्रमाचे कार्यपध्दती

  1. कार्यालयात शासन निर्णय वाचनास अव्वल कारकुन महसुल हे दररोज कोणता कर्मचारी शासन निर्णयाचे वाचन करील हे ठरवुन देतात अ.का.(म) ठरवुन दिल्याप्रमाणे प्रत्येक कर्मचारी शासन निर्णयाचे वाचन करतो. दररोज वेगवेगळ्या शाखेतील कर्मचारी वेगवेगळ्या विषयाच्या शासन निर्णयाचे वाचन करतो.

  2. कार्यालयात शासन निर्णय वाचनाचा वेळ हा सकाळी 10.00 ते 10.25 असा असुन सर्व कर्मचारी मा.तहसिलदार यांचे कक्षात सकाळी 10.00 वाजता उपस्थित होतात मा.तहसिलदार यांचे कक्षात एखादा कर्मचारी शासन निर्णयाचे वाचन करुन व शासन निर्णय कशाविषयक आहे त्यात काय आहे याबाबत आपल्या सर्व सहकारी यांना सांगतो व सकाळी 10.25 वाजता शासन निर्णय वाचन संपुण सर्व कर्मचारी आपआपल्या शाखेत कामकाजास जातात.


साध्य (Achievements)

या कार्यालयातील सर्व कर्मचारी यांना शासन निर्णयाची माहीती होत आहे तसेच सर्व कर्मचारी यांना आपल्या शाखा व्यतीरिक्त अन्य शाखेतील शासन निर्णयाचे ज्ञान होत आहे. तसेच कार्यालयातील कर्मचारी यांचा शासन निर्णयाप्रमाणे अचुकतेन संचिका शासन निर्णयासह सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

व्यंकटेश मुंडे
तहसिलदार नायगांव (खै.)

 
Top