होट्टल सांस्कृतिक तथा पर्यटन महोत्सव- २०१८
होट्टल महोत्सवा विषयी :
नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले व चालुक्यांची उपराजधानी म्हणून पुरातन काळात नावारूपाला आलेले ग्राम म्हणून होट्टलची ख्याती आहे. होट्टल येथे सिध्देश्वराचे प्राचीन चालुक्य मंदीर स्थित असून सभोवती अनेक प्राचिन मंदिरे आहेत. प्राचिन शिल्प स्थापत्य कलेचा समृध्द वारसा जतन, संवर्धन करणे पर्यटन वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जनजागृती करणे पर्यटकांना तसेच महाराष्ट्रातील लोकांना या ऐतिहासिक व प्रेक्षणिय स्थळांची माहिती देणे या दृष्टीने सांस्कृतिक तथा पर्यटन महोत्सव आयोजित होत आहे.