जिल्ह्याविषयी
नांदेड हे महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे.हे गोदावरी नदीच्या उत्तर तटवर वसलेले आहे.हे शीख गुरुद्वारांसाठी प्रसिद्ध आहे.नांदेड हे प्राचीन काळचे शहर आहे.पौराणिक काळात पांडवांनी नांदेड जिल्ह्यातून प्रवास केल्याचे सांगितले जाते.नंदांनी पिढ्यानपिढ्या नांदेडवर राज्य केले.महिमभट्टाने लिहिलेल्या लीलाचरित्र या ग्रंथात नांदेडचा उल्लेख आढळतो, त्यात नगरातील नरसिंहाच्या मूर्तीचे वर्णन आढळते, नांदेडला पूर्वी “नंदीत” म्हणून ओळखले जात असे, ज्याची पुष्टी वसिम येथे सापडलेल्या ताम्रपटावरून होते