बंद

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय रचना खालील प्रमाणे आहे.

जिल्हाधिकारी

जिल्‍हाधिकारी हे जिल्‍हा प्रशासनाचे मुख्‍य आधार आहेत. प्रत्‍येक निर्णय, कायदा आणि सुव्‍यवस्‍था, महसूल, निवडणूक, नैसर्गीक आपत्‍ती ई. महत्‍वाच्‍या जबाबद-या जिल्‍हाधिकारीस पार पाडाव्‍या लागतात. जिल्हा महसूल प्रशासनाचे मुख्य जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी असून ते जिल्ह्यातील इतर शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून देखील काम पहात असतात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक शाखा/विभाग असून अशा शाखा/विभागांवर प्रमुख म्हणून तहसिलदार/उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याचे नियंत्रण असते.

अतिरिक्त जिल्हाधिकारी

अप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना असण्या-या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा/विभाग याच्यावर नियंत्रण ठेवत असतात.

निवासी उपजिल्हाधिकारी

लेखा व अस्थापना विभाग

  • कर्मचा-यांचे सेवा पुस्तक अद्यावत ठेवणे.
  • स्वातंत्र्य सैनिकांसाठी निवृत्तीवेतन,वाहन भाडे सवलत,आर्थिक मदत व वैद्यकीय मदत देणे.
  • कर्मचा-यांचे वैद्यकीय परतावा बील अदा करणे.
  • जिल्हा कोषागार कार्यालयातील मुद्रकांची विहीत मुदतीत तपासणी करणे.
  • कर्मचा-यांचे प्रवास भत्ता देयक अदा करणे.
  • जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांचे लेखे अद्यावत ठेवणे.
  • नैसर्गिक आपत्तीसाठी प्राप्त होणारे धनादेश शासकीय खात्यात जमा करणे.
  • रजा मंजूर करणे.
  • निवृत्त होणा-या कर्मचा-यांसाठी ना-देयक दाखला,विभागीय चौकशी नसलेचा दाखला देणे.

महसूल शाखा

  • अकृषिक परवानगी देणे.
  • महसूल विभागातील लिपीक,शिपाई यांची नेमणूक करणे.
  • महसूल विभागातील लिपीक व अन्य कर्मचा-यांच्या विहीत मुदतीनंतर बदल्या करणे.
  • महसूल विभागातील सर्व कर्मचा-यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.
  • वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मच्या-यांना कायमपणाचे फायदे देणे.
  • पात्र वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मच्या-यांना आगाऊ वेतन वाढ मंजूर करणे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचे काम पाहणे.
  • माजी सैनिक,सहकारी गृह निर्माण संस्था,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक प्रयोजनासाठी शासकीय जमीन प्रदान करणे.
  • नगर भूमापन क्षेत्रातील जमीनींचे नगर भुमापनाचे आदेश काढणे.
  • महसूल कायद्यातील निरनिराळ्या तरतूदींची अंमलबजावणी करणे.
  • शासकीय थकबाकीच्या वसूलीचा मासिक आढावा घेणे.
  • पीक पाणी अहवालाचे काम करणे.
  • वाड्यांचे महसूली गावात रुपांतर करणेबाबतचे काम करणे.
  • अंतर्गत लेखा परिक्षण पथकाने काढलेल्या लेखा परिच्छदांचा निपटारा करणे.
  • वार्षिक जमाबंदी तसेच तहसिल कार्यालयांची वार्षिक तपासणी करणे.
  • तहसिल मधील सजाची पुनर्रचना करण्याचे काम करणे.
  • शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर/नियमबद्ध करणेबाबतची कार्यवाही करणे.
  • कोर्ट ऑफ वॉर्डस चे काम करणे.

गृह शाखा

  • जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था पाहणे.
  • नैसर्गिक आपत्ती,आपत्कालीन व्यवस्थेचे काम पहाणे.
  • शस्त्र परवाना देणे.
  • स्वातंत्र्य सैनिक यांना आर्थिक मदत करणे.

रोजगार हमी योजना

  • टॅंकर व्दारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
  • रोजगार हमी योजनेची कामे पुर्ण करणे.
  • टंचाई क्षेत्रातील कामे करणे.
  • मस्टर असिस्टंटची नेमणूक करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
  • टंचाई क्षेत्रातील जनावरांसाठी चारा पुरविणे.
  • रोजगार हमी योजनेची कामे करणा-या एजन्सीला अनुदान मंजूर करणे.
  • रोजगार हमी योजनेमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधीतांवर कार्यवाही करणे.

निवडणूक शाखा

  • लोकसभा,विधानसभा सार्वजनिक निवडणूकीचे काम पाहणे.
  • लोकसभा,विधानसभा पोटनिवडणूकीचे काम पाहणे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम पाहणे.
  • सहकारी साखर कारखाने,सहकारी बँका,दुध संघ यांच्या निवडणूकीचे काम पाहणे.
  • जिल्हापरिषद,पंचायत समित्या,ग्रामपंचायत निवडणूकीचे काम पाहणे.
  • मतदार यादी तयार करणे व तिचे पुनर्निरिक्षण करणे.
  • मतदार याद्यांचे संगणकीकरण करणे.
  • सर्व्हिस व्होटर्सची यादी तयार करणे.
  • सार्वजनिक निवडणूकीसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे.
  • निवडणूकीसाठी लागणारी यंत्रसामुग्री सुस्थितीत ठेवणे.

करमणूक शाखा

  • मुंबई करमणूक कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करणे.
  • करमणूक कर,उपकराची वसुली करणे.
  • सिनेमा गृह,व्हिडिओ थिएटर,डिश अ‍ॅन्टीना,व्हिडिओ गेम्स इत्यादी करमणूकींच्या माध्यमांवर नियंत्रण ठेवुन वसुली करणे.
  • सर्व करमणूक कर निरिक्षक यांचेवर नियंत्रण ठेवणे.

कुळ कायदा शाखा

  • जिल्हाधिकारी/अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे दाखल झालेल्या अपिलाचे काम पाहणे.
  • फेरफार नोंदीचा आढावा घेणे.
  • खाते पुस्तिका देणे.
  • वतन अ‍ॅबोलीशन अ‍क्टची अंमलबजावणी करणे.
  • गावठाण विस्तार योजनेचे काम पहाणे.

खनिकर्म शाखा

  • वाळू लिलावाची प्रक्रिया पार पाडणे.
  • लिलावाची रक्कम वसूल करणे.
  • विनापरवाना गौण खनिज उत्खननास आळा घालणे