बंद

तालुक्यांची संक्षिप्त माहिती

अर्धापूर तालुक्यांत एकूण 56 गावे असून 39 ग्रामपंचायत तर 1 नगरपंचायत कार्यरत आहे.तालुक्यापमध्ये मुख्यतः कापूस,केळी,सोयाबीन,हळद ही पिके घेतली जातात. नगदी पिकांमध्ये घेतले जाणारे केळी हे पिक अर्धापूर तालुक्यामधे प्रसिध्द पिक आहे. या तालुक्याची 2011 च्या जनगणने नूसार एकूण लोकसंख्या 1,09,332 आहे. अर्धापूर हा तालुका नांदेड महसूल उपविभागात येतो .नांदेड तालुक्याचे विभाजन होवून 30 डिसेंबर 1999 रोजी अर्धापूर तालुक्याेची निर्मिती झाली,अर्धापूर तालुक्याासह दाभड येथील सत्यनगणपतीचे मंदीर, मालेगांव येथील महारूद्र मारूतीचे मंदीर, केशवराज यांचा मठ, दाभड येथील बुध्दविहार,पिंपळगांव येथील महादेव मंदिर ,केळी संशोधन केंद्र प्रसिध्द, आहेत.भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना अर्धापूर तालुक्यात आहे.अर्धापूर हे तालुका मुख्या्लयाचे ठिकाण आहे.अर्धापूर येथे असाब –ए-रसूल दर्गा आहे.या दर्ग्याला विशेष महत्व आहे.या ठिकाणी एक प्रचंड लांब अशी कबर आढळते. जवळ –जवळ 29 मीटर लांब एकच कबर येथे आहे. अशी वैशिष्टयपूर्ण कबर संबध महाराष्ट्रात एकमात्र असावी.तसेच येथे श्री केशवराज मठ व हेमाडपंथी मंदिर आहे.अर्धापूर शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही नगरपंचायत असून सदर नगरपंचायत 2011 ला अस्त्विात आली.
अर्धापूर तालुका नांदेड-नागपूर या राज्य महामार्गावर नांदेड पासून 19.3 किमी अंतरावर आहे. तालुक्या मध्ये एकूण जमिनीच्या् 26,155 हेक्टर क्षेत्र लागवडीलायक असून वन जमिनी ही 2110 चौ.किमी असून मुख्यत: पाटनूर ,लहान व चेनापूर या तीन गावामध्ये हे वनक्षेत्र आहे. नगरपंचायत अस्तित्वातत असलेला नांदेड शहराला लागून सर्वात जवळ असलेला तालुका म्हयणजे अर्धापूर होय. अर्धापूर हा तालुका नांदेड पासून 19.3 किमी अंतरावर असून त्याचे क्षेत्रफळ 3950 चौकिमी आहे.अर्धापूर मुख्यालय हे 19 अंश 17’-12” उत्तर अंक्षाश तर 77 अंश 22’ – 26” पूर्व रेखांश दरम्यान आहे.तालुक्याूत आसाना नदी ही प्रमुख नदी आहे.तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 870 मिमि आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ 29,219 चौ.किमी असून तालुक्याचे पूर्वेस भोकर तालुका,पश्चिमेस परभणी जिल्हा,दक्षिणेस नांदेड तालुका तर उत्तरेस हदगाव तालुका आहे. या तालुक्यात प्रमुख पिकांपैकी केळी हे पिक महाराष्ट्रात प्रसिध्द असून खरीपामधील कापूस, सोयाबीन इतर रब्बी पिकांमध्ये हरभरा, गहू व उन्हाळी पिकांमध्ये भूईमुग व हळद हे पिके घेतली जातात.तालुक्यात ऊसाचे क्षेत्र हे मोठयाप्रमाणात असून तालुक्याात मौजे येळेगांव येथे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा जिल्हययातील सर्वात मोठे ऊसाचे गाळप करणारा कारखाना आहे.या कारखान्याचे कार्यक्षेत्र नांदेड, अर्धापूर,भोकर,मुदखेड या चार तालुक्याात विस्ताारलेले आहे.

भोकर शहर हे शहर नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये नांदेडच्‍या पुर्वेकडे 56 किमीवर वसलेले आहे. भोकर तालुका पुर्वी आंध्रप्रदेश राज्‍यामध्‍ये मुधोळ तालुक्‍यामध्‍ये समावीष्‍ट होते. महाराष्‍ट्र राज्‍याची निर्मीती झाल्‍यानंतर सन १९६० साली नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आला आहे. भोकर तालुका मराठवाड्याच्‍या उत्‍तर-पुर्व भागामध्‍ये वसलेले असुन नांदेड जिल्‍ह्यातील उमरी, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर या तालुक्‍यासोबतच तेलंगना राज्‍याच्‍या आदीलाबाद जिल्‍यातील निर्मल तालुक्‍याची सिमा भोकर तालुक्‍याला जोडलेली आहे. त्‍यामुळे भोकर तालुक्‍यातील काही गावांमध्‍ये तेलगु भाषा बोलली जाते.
भोकर तालुक्‍याचे भौगोलीक क्षेत्रफळ ६६२४७ हे आर एवढे आहे. त्‍यापैकी लागवडी लायक क्षेत्रफळ ४७४०९ हेक्‍टर एवढे आहे. त्‍यापैकी कोरडवाहू क्षेत्रफळ ४५३४५ हेक्‍टर व बागायत क्षेत्र १०६४ हेक्‍टर एवढे आहे. भोकर तालुक्‍यातील जंगलव्‍याप्‍त क्षेत्र १२००४ हेक्‍टर एवढे आहे. भोकर तालुक्‍यातील मुख्‍य पिक कापुस हे आहे. यासोबतच तुर, सोयाबीन, मुंग व उडीद ही पीके घेतली जातात.या सोबतच सिंचनाची सुवीधा उपलब्‍ध असलेल्‍या भागामध्‍ये हळद व केळी ही पीके देखील घेतली जातात. भोकर तालुक्‍यामध्‍ये सरासरी ९९६.६० मीमी पाऊस पडतो.

भोकर तालुक्‍यात धानोरा, रेणापुर(सुधा), आमठाणा व भुरभुसी येथे लघु पाटबंधारे अंतर्गत तलाव आहेत. तसेच किनी, कांडली, लामकाणी, ईळेगाव व नांदा येथे तलाव आहेत. त्‍यापैकी रेणापुर येथील सुधा प्रकल्‍प सर्वात मोठा असुन तेथुन भोकर शहराला पाणी पुरवठा केला जातो.
भोकर शहर हे राष्‍ट्रीय महामार्ग क्र 222 वर वसलेले आहे. तसेच मुंबई ते नागपुर हा लोहमार्ग भोकर शहरामधुन जातो. त्‍यामुळे भोकर हे नांदेड जिल्‍ह्यातील प्रमुख वाहतुकीचे शहर मानले जाते.
भोकर तालुक्‍यामध्‍ये एकुण ६६ ग्रामपंचायती असुन ८४ महसुली गावांचा समावेश आहे. भोकर तालुक्‍याची लोकसंख्‍या १३८३०८ एवढी असुन त्‍यापैकी पुरुष लोकसंख्‍या ७१२६७ व स्‍त्री लोकसंख्‍या ६७०४१ एवढी आहे. भोकर तालुक्‍यामध्‍ये एकुण मतदार संख्‍या ९९०२७ एवढी आहे.
भोकर शहरामध्‍ये शहराच्‍या मध्‍यभागी एक गड आहे. सदर गडाचे नाव कैलास गड असे आहे. कैलास गडावर प्राचिन काळामध्‍ये बांधकाम केलेले महादेव मंदिर आहे. तसेच एकमुखी दत्‍तात्रयाचे मंदिर आहे. त्‍याचप्रमाणे सदर कैलास गडावर पाण्‍याची तळे आहे. याशिवाय रेणापुर स्थित श्रृंगऋषी देवस्‍थान तर भुरभुसी येथे श्री दत्‍त संस्‍थान आहे. तसेच मौजे पाळज येथे श्री गणेश मंदिर हे अतिशय प्रसिध्‍द असुन गणेशोत्‍सवाच्‍या काळात भक्‍तांचा ओघ महाराष्‍ट्रातुन तसेच आंध्रप्रदेशातुन दर्शनासाठी सरु असतो.
भोकर शहर हे तालुक्‍याचे ठिकाण असुन सन २०१० पासुन नगर परिषद स्‍थापण झालेली आहे. भोकर तालुका हे भोकर उपविभागाअंतर्गत येत असुन भोकर उपविभागीय कार्यालयाची स्‍थापणा सन जानेवारी २०१० मध्‍ये झाली आहे. भोकर उपविभागा अंतर्गत तालुका भोकर व तालुका मुदखेड ह्या दोन तालुक्‍याचा समावेश होतो. भोकर तालुक्‍यामध्‍ये जिल्‍हा परिषद गटाची संख्‍या ०३ व पंचायत समितीचे ६ गणांचा समावेश आहे.

DHARMABAD

DHARMABAD MAPDHARMABAD TALUKA MAP

HADGAON

HADGAON MAPHADGAON TALUKA MAP

HIMAYATNAGAR

HIMAYATNAGAR MAPHIMAYATNAGAR TALUKA MAP

KANDHAR

KANDHAR MAP KANDHAR TALUKA MAP

KINWAT

KINWAT MAP

KINWAT TALUKA MAP

LOHA

LOHA MAP

LOHA TALUKA MAP

MAHOOR

MAHOOR MAP

MAHOOR TALUKA MAP

MUDKHED

MUDKHED MAP

MUDKHED TALUKA MAP

MUKHED

MUKHED MAP

MUKHED TALUKA MAP

NAIGAON

NAIGAON MAP

NAIGAON TALUKA MAP

नांदेड तालुका हा ऐतिहासीक दृष्टीसने महत्वा चा तालुका समजला जातो.खालसा पंथाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी यांचे काही काळ नांदेड येथे वास्तवव्यस होते. त्या मुळे नांदेड शहराला विशेष महत्वग प्राप्ती झालेले आहे.नांदेड हे जिल्हमयाचे व तालुक्यााचे मुख्याुलयाचे ठिकाण आहे. जिल्हगयातील एक उपविभागाचे ठिकाण आहे. नांदेड तालुका हा 1956 च्याा राज्य् पुनर्रजनेनंतर अस्तित्वा त आला आहे. नंदीतट या शब्दाहचा अपभ्रंश होवुन नांदेड असे नाव पडले असे म्हतणतात. तालुक्यात एकुण 2 विधान सभा मतदार संघ आहेत.जिल्हा परीषद 4 गट व पंचायत समिती 8 गण आहे. तसेच एकुण 104 महसुली गावे असून पैकी 03 गावे बेचीराग आहेत. तालुक्यात 04 वाडी व तांडे आहेत. तर 73 ग्रामपंचायत आहेत. सन 2011 च्यात जनगणनेनुसार तालुक्यातची लोकसंख्या 719188 लक्ष एवढी आहे.
नांदेड तालुक्याीत स्वायमी रामनंद तिर्थ्‍ मराठवाडा विद्यापीठ ,ज्ञानतीर्थ,विष्णुापुरी येथे कार्यरत असुन तेथे विविध शैक्षणिक बाबींच्याम शिक्षणाची सोय उपलब्धक करुन देण्याठत आली आहे. तसेच नांदेड येथे श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रीकी महाविद्यालय विष्णुापुरी येथे आहे. व डॉ.शंकरराव चव्हाुण वैद्यकीय महाविद्यालय व महात्माष गांधी मिशन अभियांत्रीकी महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय अशा मोठया शैक्षणीक संस्थाी कार्यरत आहेत.
तालुक्या.मध्येत बहुतांश लोकांचा शेती हा व्य वसाय असुन तालुक्यालत मुख्यख खरीप व काही प्रमाणात रब्बीर असे दोन्हीु हंगाम घेण्यावत येतात.तालुक्या‍तील लागवडी खालील क्षेत्र सुमारे हे.आर असुन यामध्येा प्रामुख्यायने संकरीत ज्वातरी,कापुस,मुग,उडीद,इत्या-दी, प्रमुख पिके घेतली जातात.बारमाही ओलीताच्याा क्षेत्रात ऊस व केळी ही प्रमुख पीके घेतली जातात.
नांदेड शहरामध्येह महाराष्ट्री औद्योगीक महामंडळाचे औद्योगीक क्षेत्र असुन त्यांत स्टिल उत्पाडदने,केमिकल्सष,तेल गिरण्याा,साखर कारखाने असुन शहरामध्ये एक सहकारी औद्योगीक वसाहत आहे. त्याकत लुघु उद्योग कार्यरत आहेत. हवामानाच्याम दृष्टीेने वर्षाचे तीन भाग पडतात. जुन ते सप्टेंाबर या महीण्यायत हवा साधारणतः उष्णृ जरी सअली तरी पावासामुळे किंचीत गारवा जाणवतो. ऑक्टोअबंर ते फेब्रुवारी दरम्यातन हवा कोरडी थंड असते. मार्च ते मे या महीण्यावत हवामान उष्णु व कोरडे असते

उमरी तालुक्‍याची निर्मिती 21 फेब्रुवारी 1999 रोजी (तत्‍कालीन भोकर तालुक्‍याचे विभाजनाने) झाली. महाराष्‍ट्र राज्‍यातील नांदेड हा जिल्‍हा आहे. नांदेड जिल्‍हा हा दक्षिण पूर्वेस नवनिर्मित राज्‍य तेलंगणा व कर्नाटक्‍ राज्‍याच्‍या सिमेलगत आहे. गरुगोविंदसिंग, संत कवि विष्‍णुपंत, वामन पंडित यांच्‍या पादस्‍पर्शाने पावन झालेल्‍या भूमीचे क्षेत्रफळ 10422 चौ. कि. मी. आहे. नांदेड जिल्‍ह्यातील सोळा तालुक्‍या पैकी एक हा उमरी तालुका आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात महत्‍वाची भूमिका बजावणारा हा तालुका होय. उमरीला नैसर्गिक व भौगोलिक दृष्‍ट्या सक्षमता लाभलेली आहे. या तालुक्‍याला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेली आहे. शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक, व्‍यापारी, आर्थिक दृष्‍टीने सर्वांगपूर्ण बनलेले शहर आहे.

प्राचीन काळापासून महाराष्‍ट्रला वेगवेगळ्या घराण्‍याचा इतिहास लाभलेला आहे. त्‍यात सातवाहन, वाकाटक, बदामीचे चालुक्‍य, राष्‍ट्रकूल, यादव, मुस्लिम, छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांची सत्‍ता, निजाम राजवटीतील महाराष्‍ट्र मधील मराठवाडा विभागातील उमरी तालुक्‍याला नांदड जिल्‍ह्याचा विशेष भाग म्‍हणून प्राचीन काळापासून विशेष महत्‍व आहे.
भारताला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामधून तत्‍कालीन सत्‍तेच्‍या विरुध्‍द अनेक लढे चालू होते. त्‍यामध्‍ये मराठवाड्याच्‍या मुक्‍तीसाठी व निजाम राजवटीतून मुक्‍तता करुन देण्‍यासाठी वेगवेगळे प्रयत्‍न चालू होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्‍ये महाराष्‍ट्र परिषद, स्‍टेट कॉंग्रेस कार्यरत असताना महाराष्‍ट्र परिषदेचे पहिले अधिवेश्‍न 1936 मध्‍ये, दुसरे अधिवेशन परतूर येथे महत्‍वपूर्ण तिसरे अधिवेशन नांदेड जिल्‍ह्यातीलउमरीतालुक्‍यात दि. 29, 30 व 31 मे 1941 दरम्‍यान पार पडले. या अधिवेशनाचे स्‍वागताध्‍यक्ष श्री. देविदासराव लव्‍हेकर, अधिवेशनाचे अध्‍यक्ष श्री. काशीनाथराव वैद्य या अधिवेशनाचे महत्‍व म्‍हणजे सर्व समाजातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि अनेकजणांनी, सहभाग म्‍हणून बॅंक लुटीच्‍या माध्‍यमातून ‘ऑपरेशन उमरी बॅंक’ निश्चित करण्‍यात आला. उमरी बॅंक लुटण्‍याच्‍या काळात तीन हल्‍ले झाले. पहिला हल्‍ला रेल्‍वे स्‍थानकावर, दुसरा हल्‍ला पोलिस ठाण्‍यावर आणि तिसरा हल्‍ला बॅंकेवर दुपारी तीन वाजता. अठरापोत्‍यात 22 लाख 66 हजार रक्‍कम लंपासकेली. अशा वेगवेगळ्या घटनेची साक्षी देण्‍या-या उमरीचा भव्‍य असा इतिहास आहे. सरदार वल्‍लभभाई पटेल हे भारताचे गृहमंत्री असताना 17 सप्‍टेंबर 1948 ला मराठवाडा मुक्‍त केला. त्‍यावेळेस उमरी तालुका ही निजामाच्‍या गुलामगिरीतून मुक्‍त झाला.