उणकेश्वर महादेव मंदिर
श्रेणी
धार्मिक
उणकेश्वर हे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर स्थित असून नांदेडपासून सुमारे 180 कि.मी. अंतरावर आहे. येथे असलेले उणकेश्वर महादेव मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान व पर्यटनस्थळ आहे.
हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील असून मंदिर परिसरात गरम पाण्याचे नैसर्गिक झरे व कुंड आहेत. या झऱ्यांमधून वर्षभर नैसर्गिकरित्या गरम पाणी वाहत असते. लोकमान्य समजुतीनुसार, या पाण्यात स्नान केल्यास त्वचारोग व पांढरे डाग कमी होतात.
श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे यात्रा भरते. या काळात राज्य व परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.