काळेश्वर मंदिर
श्रेणी
धार्मिक
काळेश्वर मंदिर हे नांदेड शहरालगत मोजे विष्णूपुरी (ता. नांदेड) येथे, शहरापासून सुमारे 6–7 कि.मी. अंतरावर स्थित आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले असून, त्याचा इतिहास 13व्या शतकातील (सुमारे 800 वर्षे जुना) आहे.
याच परिसरात विष्णूपुरी प्रकल्प उभारण्यात आल्यामुळे मंदिर परिसर अत्यंत नयनरम्य झाला आहे. हे महादेवाचे मंदिर असल्याने श्रावण महिन्यात राज्य तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.