बावरी नगर दाभड महाविहार – नांदेड
बावरी नगर दाभड महाविहार हे नांदेड–भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर, नांदेड शहरापासून सुमारे 7 कि.मी. अंतरावर स्थित असलेले एक महत्त्वाचे बौद्ध तीर्थक्षेत्र आहे.
या महाविहार परिसरामध्ये ध्यान केंद्र, बहुउद्देशीय सभागृह, भिक्खू व भिक्खुणी निवास, भोजन कक्ष तसेच पूर्णाकृती अशोक स्तंभ उभारण्यात आलेला आहे. हा अशोक स्तंभ सुमारे 65 फूट उंच असून, मध्यप्रदेशातील लाल दगडापासून तयार करण्यात आला आहे.
दरवर्षी पौष पौर्णिमेच्या दिवशी येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेसाठी देश-विदेशातून आमंत्रित विद्वान भिक्खू धम्मदेशनासाठी उपस्थित राहतात. त्यांच्या धम्मदेशनाचा लाभ घेण्यासाठी लाखोच्या संख्येने उपासक व उपासिका या महाविहारास भेट देतात.
समाजप्रबोधन, शांती आणि करुणेचा संदेश देणारे हे क्षेत्र दक्षिण भारतातील एक प्रभावी धम्मक्षेत्र म्हणून विशेष ओळख प्राप्त करून आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
सर्वात जवळचे विमानतळ : नांदेड विमानतळ (Shri Guru Gobind Singh Ji Airport). विमानतळापासून अंतर : सुमारे 7 कि.मी. विमानतळावरून टॅक्सी / ऑटो / खासगी वाहनाने सहज पोहोचता येते.
रेल्वेने
सर्वात जवळचे रेल्वे स्थानक : नांदेड रेल्वे स्थानक रेल्वे स्थानकापासून अंतर : सुमारे 13 कि.मी. स्थानकावरून ऑटो, रिक्षा, टॅक्सी किंवा सिटी बस उपलब्ध आहेत.
रस्त्याने
बावरी नगर दाभड महाविहार हे नांदेड–अर्धापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 (NH-161) वर स्थित आहे. हे स्थळ नांदेड शहरापासून सुमारे 12-13 कि.मी. अंतरावर आहे. राज्य परिवहन बस, खासगी वाहन, टॅक्सी व ऑटो या सर्व माध्यमांनी प्रवास सुलभ आहे. नांदेड मध्यवर्ती बस स्थानकावरून अर्धापूर मार्गावरील बसेस नियमित उपलब्ध आहेत.