बंद

सहस्त्रकुंड धबधबा

श्रेणी अॅडवेन्चर, नैसर्गिक/मोहक सौंदर्य

सहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात, सहस्त्रकुंड गावाजवळ पैनगंगा नदीवर स्थित आहे. निसर्गरम्य सौंदर्यामुळे हे ठिकाण एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.
या परिसरात सुमारे 6,000 कुंड असून पावसाळ्यात धबधब्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

हे पर्यटनस्थळ नांदेड मुख्यालयापासून सुमारे 70 कि.मी. अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे मार्ग उपलब्ध असून, जवळचे रेल्वे स्थानक धबधब्यापासून सुमारे 5 कि.मी. अंतरावर (उत्तरेकडे) आहे.
राज्य तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे भेट देतात.

छायाचित्र दालन

  • Sahsastrakunda-waterfall__
  • Sahsastrakunda-waterfall
  • Sahastrakund Waterfall