बंद

माळेगाव यात्रा

श्रेणी धार्मिक

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मोजे माळेगाव येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अशी खंडोबा (म्हाळसाकांत) यात्रा भरते. यात्रेचा शुभारंभ म्हाळसाकांत खंडोबा यांच्या पालखीच्या भव्य मिरवणुकीने केला जातो.

या यात्रेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण भारतातील विविध राज्यांतून भाविक, नागरीक व व्यापारी मोठ्या संख्येने येतात. यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे घोडे, गाढव व इतर पशुधनाचा मोठ्या प्रमाणावर होणारा व्यापार. हे स्थळ नांदेड शहरापासून सुमारे 57 कि.मी. अंतरावर, नांदेड–लातूर मार्गावर आहे.

दरवर्षी यात्रेचे नियोजन जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. यात्रेदरम्यान पशुप्रदर्शन, पारंपरिक घोडेस्वारी, कुस्ती दंगल तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कला महोत्सव, ज्यामध्ये राज्य व परराज्यातील कलाकार मोठ्या संख्येने सहभागी होतात. ही यात्रा सुमारे 15 दिवस चालते आणि दक्षिण भारतातील मोठ्या यात्रांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ मालेगाव येथून 50 किमी अंतरावर नांदेड विमानतळ आहे

रेल्वेने

माळेगांव पासून जवळचे रेल्वे स्टेशन 50 किमी दूर आहे

रस्त्याने

नांदेड येथून वारंवार येणारी बस आहे