घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६
1. धोरण आणि परिचय : –
SWM नियम २०२६ मार्गदर्शक तत्त्वे: भारत राजपत्रातील तरतुदी, अंमलबजावणी तारीख (१ एप्रिल २०२६) आणि जिल्ह्याची उद्दिष्टे.
कचरा वर्गीकरण नियम: ४ प्रकारांत कचरा वेगळा करण्यासाठी मार्गदर्शन:
ओला कचरा: स्वयंपाकघरातील व सेंद्रिय कचरा.
सुका कचरा: पुनर्चक्रणयोग्य व ज्वलनशील कचरा.
सॅनेटरी कचरा: डायपर, सॅनेटरी नॅपकिन्स इत्यादी.
विशेष काळजी कचरा: ई-कचरा, मुदतबाह्य औषधे, बल्ब, रासायनिक डब्बे.
2. ठोक कचरा उत्पादकांसाठी विभाग : –
ऑनलाइन नोंदणी: https://swm.cpcb.gov.in/ हॉटेल्स, मोठ्या निवासी सोसायट्या व संस्थांसाठी अनिवार्य नोंदणी
EBWGR प्रमाणपत्रे: विस्तारित थोक अपशिष्ट जनित्र उत्तरदायित्व प्रमाणपत्र मिळवण्याची सोय.
वार्षिक रिटर्न सबमिशन: दरवर्षी ३० जूनपूर्वी वार्षिक रिटर्न सबमिट करण्याची सोय.
3. ऑपरेटर व पुनर्चक्रणकर्ते : –
ऑपरेटर नोंदणी: कचरा प्रक्रिया चालक आणि अनधिकृत कचरा वेचकांच्या अधिकृत नोंदणीची सोय.
त्रैमासिक व वार्षिक अहवाल: सुविधा चालकांसाठी Form-III नुसार अहवाल सबमिट करणे.
सेंद्रिय खत विक्री: जिल्हा केंद्रांवर तयार होणाऱ्या जैविक खताचे दर आणि उपलब्धतेची माहिती.
4. नियम, उपयोक्ता शुल्क व दंड : –
स्थानिक उप-कायदे व शुल्क: कचरा संकलनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरवलेले उपयोक्ता शुल्क (User Fees).
पर्यावरण प्रतिकर (दंड): कचरा न वेगळा करणे, उघड्यावर कचरा जाळणे किंवा फेकणे यावरील दंडाची नियमावली.
सार्वजनिक ऑडिट अहवाल: लँडफिल आणि प्रक्रिया केंद्रांचे वार्षिक ऑडिट अहवाल.


SWM Rules, 2026 Link-
https://drive.google.com/file/d/1caHLCm2skAMRPnrfFXETQbPWircGfXMP/view?usp=sharing
SWM 2026 Notification Link –
https://drive.google.com/file/d/1M2T10Mx9EguvTIx-moCHl_6A4FkMCeBA/view?usp=sharing
ULB Wise Implimentation Link –
https://drive.google.com/drive/folders/1wBNLqnKAD8t3uwYLUMbsieoZ-_Ur4aZZ?usp=sharing