सचखंड गुरुद्वारा नांदेड
तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड
तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे नांदेड शहरातील एक अत्यंत पवित्र व ऐतिहासिक गुरुद्वारा असून, शीख धर्माच्या पाच सर्वोच्च तख्तांपैकी एक आहे. शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोविंदसिंहजी महाराज यांनी इ.स. 1708 मध्ये याच पवित्र स्थळी आपला देह ठेवला. त्यामुळे या स्थळाला शीख धर्मात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
दक्षिण भारतातील शीखांचे हे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते आणि श्रद्धेच्या व आध्यात्मिक महत्त्वामुळे यास “दक्षिणेची काशी” असेही संबोधले जाते. श्री गुरु गोविंदसिंहजी महाराजांच्या स्मरणार्थ येथे भव्य व कलात्मक गुरुद्वाऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
नांदेड शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असलेले हे पवित्र स्थळ दरवर्षी देश-विदेशातून लाखो शीख भाविकांसह सर्व धर्मीय श्रद्धाळूंना आकर्षित करते. श्रद्धा, शौर्य आणि अध्यात्म यांचा संगम असलेले तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे शीख धर्माच्या इतिहासातील एक अमूल्य वारसा आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
सर्वात जवळचे विमानतळ श्री गुरु गोबिंद सिंह जी विमानतळ, नांदेड गुरुद्वारापासून 4 किमी अंतरावर आहे
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक हजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा पासून 1 किमी अंतरावर आहे
रस्त्याने
नांदेड बस स्टँड गुरुद्वारापासून साधारण 1.5 किमी दूर आहे